Bmc Election 2022: मुंबई महापालिका निवडणूक ही पुढील वर्षी होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यातच भाजप मुंबई अध्यक्ष आणि आमदार आशिष शेलार यांच्या खांद्यावर पक्षाने गुजरात निवडणुकीची जबाबदारी सोपवण्यात आल्याची माहिती मिळत आहे. पक्षाने त्यांच्याकडे गुजरात निवडणुकीत दहा विधानसभा जागेची जबाबदारी दिली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. अशातच आशिष शेलार जर गुजरातला असणार तर भाजप मुंबई महापालिका निवडणूक कोणाच्या नेतृत्वात लढवणार, असा सवाल आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातमध्ये डिसेंबर महिन्यात निवडणुका पार पडणार आहे. यातच गुजरातमधील सुरत येथील 10 विधानसभा जागेची जबाबदारी आशिष शेलार आणि त्यांच्या टीमला देण्यात आली आहे. अशातच ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात मुंबईत महापालिका निवडणूक होणार, असं बोललं जात होत. मात्र यासाठी आता सरकार तयार नाही आहे का, अशी चर्चा आहे. मुंबई महापालिका किंवा इतर नगरपालिकांमध्ये कधी निवडणुका घ्यायच्या याची जबाबदारी निवडणूक आयोगाची असते. यात सरकारचीही मोठी जबाबदारी असते.
तत्पूर्वी सर्वोच्च न्यायालयाने देखील सरकारला लवकरात लवकर महापालिका निवडणूक घ्या, अशा सूचना केल्या होत्या. त्यावर सरकारनं म्हटलं होत की, ''मुंबई आणि परिसरात मोठ्या प्रमाणात पावसाचे वातावरण आहे. त्यामुळे महापालिका निवडणुका पुढे ढकलल्या पाहिजेत.'' एकंदरीत आशिष शेलार यांना सुरतची जबाबदारी देणं यातून संकेत मिळतात की, शेलार सुरतमध्ये जर व्यस्त असले. तर मुंबईकडे कोण लक्ष देणार. कारण भाजपसाठी देखील ही मुंबई महापालिकेची निवडणूक खूप महत्वाची आहे.
मुंबईतल्या राजकारणावर वर्चस्व केवळ भाजपचं असावं: अमित शाह
दरम्यान, मागील आठवड्यात मुंबई दौऱ्यावर आलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महापालिका निवडणुकीवर भाष्य केलं होत. ते म्हणाले होते की, ''मुंबईतल्या राजकारणावर वर्चस्व केवळ भाजपचं असावं. आता वेळ आली आहे की उद्धव ठाकरेंना जागा दाखवली पाहिजे.'' ते म्हणाले होते की, भाजपचा एक एक कार्यकर्ता मैदानात उतरला पाहिजे. वर्ष 2019 मधे पहिल्यांदा भाजपचं संपूर्ण बहुमताचं सरकार आलं. असं पहिल्यांदाच झालं आहे. वर्ष 2014 मध्ये केवळ दोन जागांसाठी शिवसेनेने युती तोडली होती, असल्याचं ते म्हणाले होते.
इतर महत्वाची बातमी:
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिवेशनात सगळे बोलले, अजित पवारांना संधी का नाही?
शिवसैनिक हेच शिवसेनेचं ब्रह्मास्त्र, प्रभादेवी येथील राड्यानंतर उद्धव ठाकरेंकडून शिवसैनिकांचं कौतुक