Abdul Sattar On Jayant Patil : मुंबई उच्च न्यायालयाच्या (Mumbai High Court) वतीने आयोजित करण्यात आलेल्या सत्काराच्या कार्यक्रमात सर्वोच्च न्यायालयाचे नवे सरन्यायाधीश उदय लळीत (CJI Uday Lalit) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकाच व्यासपीठावर बसले होते. त्यामुळे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. त्यांच्या याच टीकेला आता कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी उत्तर दिले आहे. मुख्यमंत्र्यांवर अशाप्रकारे बोलणे म्हणजेच बालिशपणाचे लक्षण असल्याची टीका अब्दुल सत्तार यांनी केली आहे.
या सर्व प्रकरणावर बोलतांना अब्दुल सत्तार म्हणाले, जयंत पाटलांना फक्त विरोधी पक्षाची भूमिका बजावायची आहे. मुख्यमंत्री जर मूळच्या महाराष्ट्रातल्या आणि आता देशाचे सरन्यायाधीश झालेल्यांच्या सन्मानाच्या सोहळ्यात जात असतील आणि त्याचा वेगळा अर्थ काढला जात असेल तर हे दुर्दैव आहे. सरन्यायाधीशांच्या बद्दल टीकाटिप्पणी करण्याचा कोणालाही अधिकार नाही. त्यांच्या सन्मान राखला गेला पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांनी सन्मानाच्या कार्यक्रमाला जाणं यात काहीच गैर नाही. तरीही जर कुणी असे बोलणारे असेल तर हे बालिशपणाचे लक्षण आहेत.
आता त्यांना मुख्यमंत्री उत्तर देतील...
पुढे बोलतांना सत्तार म्हणाले की, जयंत पाटील खूप मोठे नेते आहेत. मी त्यांच्यावर टीका करणार नाही. मात्र अशी भाषा करून आज आपल्या राज्याचा माणूस सर्वात मोठ्या पदावर पोहोचला आहे, देशाचा सरन्यायाधीश झाला आहे, त्याच्या सन्मानाचे कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी जाण्याबद्दल जर टीका करत असतील तर मुख्यमंत्री त्याबद्दल उत्तर देऊ शकतील, असेही सत्तार म्हणाले आहे.
काय म्हणाले होते जयंत पाटील...
सरन्यायाधीश उदय लळीत आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकाच व्यासपीठावर आल्याने यावर प्रतिक्रिया देतांना जयंत पाटील म्हणाले होते की, सर्वोच्य न्यायालयाच्या घटनापीठासमोर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सरकारच्या वैधतेची गंभीर सुनावणी सुरु आहे. असे असताना मुख्यमंत्र्यांनी सर्वोच्य न्यायालयाचे सरन्यायाधीश यांच्यासोबत एका व्यासपीठावर बसणे, हे संकेतांना धरून नसल्याचा आक्षेप जयंत पाटील यांनी घेतला आहे.
महत्वाच्या बातम्या...
कलह मिटविण्याची इच्छा असलेले 'लळीत' सर्वोच्च पदावर पोहचले हा विलक्षण योगायोग : एकनाथ शिंदे