मुंबई : शिवसैनिक हेच शिवसेनेचं (Shiv Sena ) ब्रह्मास्त्र आहेत असे म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि युवासेना प्रमुख आदित्य  ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी महेश सावंत यांच्यासह काल प्रभादेवी येथे शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना भिडणाऱ्या शिवसैनिकांच कौतुक केलंय. उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांवर कौतुकाची थाप मारली आहे. कालच्या राड्यानंतर शिवसैनिकांना पोलिसांनी अटक केली होती. परंतु, आज या सर्वांची सुटका करण्यात आली. त्यानंतर हे शिवसैनिक उद्धव ठाकरे यांना भेटायला गेले होते. यावेळी महेश सावंत यांना उद्धव ठाकरे यांच्या बाजूला बसायला देत आदित्य ठाकरे शिवसैनिकांमध्ये बसले. 


प्रभादेवी येथील राड्यानंतर अटक करण्यात आलेल्या शिवसैनिकांची आज सुटका झाली. सुटका झाल्यानंतर या शिवसैनिकांनी मातोश्री येथे जाऊन शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी या शिवसैनिकांना संयम बाळगण्यास सांगितले असल्याचे या शिवसैनिकानी सांगितले. शिवाय उद्धव ठाकरे यांनी या शिवसैनिकांचे कौतुक देखील केले. यावेळी महेश सावंत यांनी संतोष तेलवणे यांना उद्धेशून अंगावर आल्यानंतर शिंगावर घेतला असे म्हटले.  


शिंदे गटातील संतोष तेलवणे यांनी गणेश विसर्जना दरम्यान झालेल्या वादाबाबत फेसबुकवर आणि व्हाट्सएपच्या एका पोस्टमध्ये अपशब्द वापरले होते. त्यावरून झालेल्या वादातून शिवसैनिकांनी संतोष तेलावणे यांना शनिवारी मारहाण केली. याबाबत महेश सावंत म्हणाले, "गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून संतोष तेलवणे हा अश्लील मेसेज करत डीवचत होता. त्यामुळे आम्ही त्याला विचारण्यास गेलो होतो. त्यावेळी तो अंगावर आला, त्यामुळे त्याला शिंगावर घेतला. आमची सवयच आहे की, अंगावर आला तर शिंगावर घ्यायची. परंतु, 395 कलम लावायची गरज नव्हती. कारण आम्ही काय दरोडेखोर नाही. आमदार सदा सरवणकर यांनी फायरिंग केली. शिवाय माझ्या घरात येऊन माझ्या बायकोला धमकवायला गेले होते. 


उद्धव ठाकरेंकडून संयम बाळगण्याचे आव्हाहन 
"माझ्या बायकोला धमकवायला गेले होते. त्यामुळे  शेवटी आमची ताकद दाखवायला लागली. सर्व शिवसैनिक एकनिष्ठ आहेत. महाराजांकडे जेवढे निष्ठावंत होते तेवढे निष्ठावंत इकडे आहेत. उद्धव ठाकरे म्हणाले संयम बाळगा, मुद्दामहून कोणाच्या वाटेला जाऊ नका, असे महेश सावंत यांनी सांगितले.  


संतोष तेलवणे यांनी मद्यपान केले होते असा आरोप महेश सावंत यांनी केलाय.  गणपती विसर्जन मिरवणूकमध्ये संतोष तेलवणे यांनी मद्यपान केले होते. शिवाय ते आदित्य ठाकरे  यांच्या नावाने टिंगल करत होते. त्यामुळे आमचा संयम सुटला. अटक केल्यानंतर दादर पोलीस स्टेशने आमचे रूप बघितले आहे, असे महेश शिंदे यावेळी म्हणाले. 


महत्वाच्या बातम्या


Shivsena Vs Shinde : प्रभादेवीत मध्यरात्री शिवसेना-शिंदे गटात जोरदार राडा; आमदार सरवणकरांचा हवेत गोळीबार? 


Shivsena Prabhadevi Rada : प्रभादेवी राडा: सदा सरवणकर यांचा कट्टर समर्थक ते विरोधक; महेश सावंत आहे तरी कोण?