Mumbai South Central Lok Sabha Result 2024: मुंबई : दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघाचे (Mumbai South Central Lok Sabha Election Result 2024 LIVE) सकाळी 11 वाजेपर्यंतचे कल हाती आले असून शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अनिल देसाई यांनी सध्या मोठी आघाडी घेत विजय मिळवला आहे. तर, शिंदे गटाच्या राहुल शेवाळेंचा दारुण पराभव झाला आहे. ठाकरेंचा मुंबईतील हा पहिला विजय आहे. 

लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) अनेक मतदारसंघांमध्ये चुरशीची लढाई पाहायला मिळाली. महाराष्ट्रानं (Maharashtra Politics) गेल्या दोन वर्षांच न भूतो न भविष्यती अनेक राजकीय भूकंपांचा (Maharashtra Politicle Crisis) सामना केला आहे. तसेच, शिवसेना (Shiv Sena) आणि राष्ट्रवादी (NCP) यांच्यातील फुटीनंतरची पहिली सार्वत्रिक निवडणूक असल्यामुळे या निवडणुकीला महत्त्व प्राप्त झालेलं. त्यातल्या त्यात मुंबईतील मतदारसंघांवर सर्वांच्याच नजरा खिळलेल्या. 

मुंबईतील अनेक जागांवर शिवसैनिक एकमेकांविरोधात लोकसभेच्या रिंगणात उतरलेले. त्यापैकी एक मतदारसंघ म्हणजे, दक्षिण मध्य मुंबईचा मतदारसंघ (Mumbai South Central Lok Sabha Constituency). या मतदारसंघातून शिवसेनेकडून (Shiv Sena) राहुल शेवाळे (Rahul Shewale), तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena : Uddhav Balasaheb Thackeray) गटाकडून अनिल देसाई (Anil Desai) मैदानात उतरले होते. 

मतदारराजाचा कौल ठाकरेंच्या बाजूनं, अनिल देसांईंच्या गळ्यात विजयाची माळ

मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेचे राहुल शेवाळे आघाडी टिकवून होते. मात्र, त्यानंतर अनिल देसाईंनी मोठी आघाडी घेत, राहुल शेवाळेंना पिछाडीवर टाकलं आणि मुंबईतील पहिला विजय ठाकरेंकडे खेचून आणला. पक्षफुटीनंतरची पहिली निवडणूक असल्यामुळे ठाकरे आणि शिंदे दोघांसाठीही ही निवडणूक प्रतिष्ठेची होती. अशातच मतदारराजानं ठाकरेंच्या बाजूनं कौल देत अनिल देसांईंच्या गळ्यात विजयाची माळ घातली. 

कष्टकऱ्यांचा मतदारसंघ अशी ओळख असलेल्या मुंबईतील दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघाला (South-Central Mumbai Constituency) भारताच्या निवडणुकीच्या राजकारणात अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. 

दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचा निकाल (Mumbai South Central Lok Sabha Result 2024)

उमेदवाराचं नाव (Rahul Shewale vs Anil Desai) पक्ष (Shinde Group vs Thackeray Group) आघाडीवर/पिछाडीवर (सकाळी 11 वाजेपर्यंत)

अनिल देसाई 

शिवसेना ठाकरे गट 

विजयी

राहुल शेवाळे (विद्यमान खासदार)

शिवसेना शिंदे गट

पराभव

घटलेल्या मतदानाचा टक्का कुणाच्या पथ्यावर? 

दक्षिण-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी (Mumbai South Central Lok Sabha Constituency) 20 मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. शिवसेनेतील फुटीनंतर झालेल्या पहिल्या लोकसभा निवडणुकीत मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघात मतदानाचा टक्का यंदा तब्बल 1.62 टक्क्यांनी घटला. विशेष म्हणजे, सहा विधानसभा मतदारसंघांपैकी पाच ठिकाणच्या मतदानात ही घट पाहायला मिळाली. आता ही मतदानाची घटलेली टक्केवारी कुणाचा पथ्यावर पडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघात 2019 मध्ये 55.2 टक्के मतदान झालं होतं. यंदा टक्का वाढवण्यासाठी सर्वच पक्षांकडून जोर लावण्यात आला होता, पण त्याचा फारसा फरक पडल्याचं पाहायला मिळालं नाही. यंदा गतवेळीच्या तुलनेत 1.62 टक्के मतदान कमी झालं. यंदाच्या निवडणुकीत केवळ 53.60 टक्के मतदान झालं. 

दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघात शिवसेना (शिंदे गट) विद्यमान खासदार राहुल शेवाळे आणि ठाकरेंचे अनिल देसाई यांच्यात थेट लढत आहे. या क्षेत्रात भाजपाचे दोन, शिंदेंचा एक असे महायुतीचे तीन आमदार आहेत. तर, काँग्रेसचा एक आणि ठाकरेंचा एक असे महाविकास आघाडीचे दोन आमदार आहेत. 

कोणत्या विधानसभा मतदारसंघात कुणाचं प्राबल्य? 

माहिम विधानसभा मतदारसंघात शिंदेसेनेचे सदा सरवणकर हे विद्यमान आमदार आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत राहुल शेवाळे यांना या मतदारसंघातून 53 हजार एवढं मताधिक्य मिळाले होते. शिवसेना भवनाच्या अंगणात असलेल्या या मतदारसंघात मराठी मतांचा टक्का मोठा आहे; मात्र माहीम मतदारसंघात गेल्या वेळच्या 58.16 टक्क्यांवरून मतदानाचा टक्का 57.97 टक्क्यांवर आला आहे. दोन्ही शिवसेनेतील फुटीनंतर आता मराठी मते नक्की कोणाकडे वळणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. 

धारावी विधानसभेतून महाविकास आघाडीला अधिक मते मिळण्याची अपेक्षा होती. धारावी पुनर्विकासाच्या मुद्द्यावरून आघाडीने रान उठविले होते. राहुल गांधी यांच्या भारत न्याय यात्रेचा समारोपही धारावीत झाला होता. सध्या काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत.

तसेच दाक्षिणात्य मतदारांना आकर्षित करण्यासाठी राहुल शेवाळे यांच्यासाठी भाजपाने तामिळनाडू अध्यक्ष के. अन्नामलाई यांची सभा धारावीत घेतली होती; मात्र या मतदारसंघातही मतदानाच्या टक्केवारीत किरकोळ अशी केवळ 0.44 टक्क्यांचीच वाढ झाली आहे. त्यातच सायन कोळीवाडा भागातून भाजपाचे कॅप्टन तमिळ सेल्वन हे आमदार आहेत; मात्र या मतदारसंघातही 2.15 टक्क्यांनी मतदान घटले आहे. अणुशक्तीनगर भागात मुस्लिम मतदारांची संख्या मोठी आहे. या भागात राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आमदार आहेत. या निवडणुकीत त्यांनी कोणत्याही पक्षाची बाजू न घेता तटस्थ भूमिका मांडली. त्यातून अणुशक्तीनगर भागातही मतदानाचा टक्का 1.95 टक्क्यांनी घसरला.

चेंबूर भागात उद्धवसेनेचे प्रकाश फातर्पेकर हे विद्यमान आमदार आहेत. या सहाही विधानसभा मतदारसंघात मतदानाच्या टक्केवारीत सर्वाधिक 3.21 टक्क्यांची घसरण चेंबूरमध्ये झाली आहे. विद्यमान आमदार असलेल्या फातर्पेकरांच्या मतदारसंघातच मतदान कमी झाल्याने त्याचा फटका नक्की कोणाला बसणार हे पाहावे लागेल. तर भाजप आमदार कालिदास कोळंबकर यांच्या वडाळा मतदारसंघातही मतटक्का 2.47 टक्क्यांनी घसरला आहे.

मतदानाची टक्केवारी 

मुंबई दक्षिण मध्य विधानसभा मतदारसंघ 2019 लोकसभा निवडणूक  2024 लोकसभा निवडणूक 
अणुशक्तीनगर 55.95 टक्के    54.28 टक्के 
चेंबूर 56.69 टक्के     53.48 टक्के 
धारावी  48.08 टक्के  48.52 टक्के 
सायन कोळीवाडा  53.78 टक्के     51.63 टक्के 
वडाळा  59.58 टक्के     57.11 टक्के 
माहिम  58.16 टक्के     57.97 टक्के 

कोणत्या विधानसभा मतदारसंघात कोण आमदार?

विधानसभा मतदारसंघ आमदाराचं नाव  पक्ष 
अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघ आमदार नवाब मलिक  राष्ट्रवादी काँग्रेस 
चेंबुर विधानसभा मतदारसंघ आमदार प्रकाश फातर्पेकर शिवसेना (ठाकरे गट)
धारावी विधानसभा मतदारसंघ आमदार वर्षा गायकवाड काँग्रेस 
सायन कोळीवाडा विधानसभा मतदारसंघ आमदार कॅप्टन तमिळ सेल्वन भाजप
वडाळा विधानसभा मतदारसंघ आमदार कालिदास कोळंबकर भाजप 
माहिम विधानसभा मतदारसंघ आमदार सदा सरवणकर शिवसेना (शिंदे गट)

2019 लोकसभा निवडणुकांचा (Mumbai South Central Lok Sabha Constituency)

2019 लोकसभा उमेदवार आणि पक्ष मतं विजयी/पराभूत 
राहुल शेवाळे (शिवसेना) 4,24,913 विजयी 
एकनाथ गायकवाड (काँग्रेस) 2,72,774 पराभूत 

दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघाची वैशिष्ट्य (Mumbai South Central Lok Sabha Constituency)

दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघ म्हणजे, मुंबईतील कष्टकरी वर्गाचा मतदारसंघ असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. या मतदारसंघात उच्चभ्रू, उच्च मध्यमवर्गीयांपासून ते हातावर पोट असणारा गरिब कष्टकरी वर्गदेखील या मतदारसंघात आहे. समाजातील अनेक आर्थिक स्तरातील लोक या मतदारसंघात राहातात.

महत्त्वाची बाब म्हणजे, छोट्या छोट्या उद्योगधंद्यांद्वारे अब्जावधींची उलाढाल करणारी आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेली धारावी देखील याच मतदारसंघात आहे. एकंदरीत अनेक धर्म, अनेक भाषा, अनेक जाती असं या मतदारसंघाचं स्वरुप आहे. धारावीमध्ये देशातील दक्षिण आणि उत्तर भागातून मतदार स्थायिक झाले आहेत. तर, चेंबूरदेखील याच मतदारसंघात येतं. 

दरम्यान, 2024 च्या लोकसभा निवडणुका अत्यंत चुरशीच्या होणार आहेत. याचं कारण म्हणजे, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या पक्षांमधील बंड. यंदाच्या निवडणुकीबाबत मतदारांमध्येही प्रचंड उत्साह आहे. मतदार राजा अधिक जागरूक आणि लोकशाहीत मताची ताकद दाखवण्यासाठी सज्ज आहे. सातत्यानं ठाकरे आणि शिंदेंकडून मतदारांचा कौल आम्हालाच असा दावा केला जातो. त्यामुळे काहीच तासांत मतदार राजाचा खरा कौल कोणाला? हे स्पष्ट होणार आहे.