Maratha Reservation: आझाद मैदानावर खासदार संभाजीराजे छत्रपती यांचे आमरण उपोषण सुरू आहे. या आंदोलनात मोठ्या संख्येने मराठा समाजाचे लोक सहभागी झाले आहेत. मराठा समजला आरक्षण मिळावं म्हणून उपोषणाला बसलेले संभाजीराजे छत्रपती म्हणाले आहेत की, मी 2007 पासून या लढ्यात आहेत. टीका करण्यासाठी म्हणून मी उपोषण करत नसल्याचे ते यावेळी म्हणाले आहेत.
संभाजीराजे छत्रपती यांचे आमरण उपोषण सुरू झाल्यापासूनच वेगेवेगळ्या राजकीय पक्षाचे नेते हे आंदोलनस्थळी भेट देत आहेत. अशाच आज मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर या देखील संभाजीराजे यांची भेट घेण्यासाठी आझाद मैदानावर दाखल झाल्या होत्या. महापौर याठिकाणी दाखल होताच मराठा क्रांती मोर्च्याच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शन सुरू केली. याच दरम्यान, मंचावरून बोलत असताना संभाजीराजे म्हणाले की, ''सगळ्यांच्या भावना आक्रोश मी समजू शकतो. मी 2007 पासुन या लढ्यात आहे. मी टिका करण्यासाठी उपोषण करत नाही. समाजाला वेठीस धरु नये.'' महाविकास आघाडी सरकार मार्ग काढू शकते, असा विश्वास संभाजीराजेंनी व्यक्त केला. गरीब मराठा समाजाला न्याय द्या, आताचा राग कोणाबद्दल नाही, असेही संभाजीराजे म्हणाले. मला कोणाला दोषी धरायचे नाही. या समाजाला न्याय मिळायला हवा ही माझी प्रमाणिक इच्छा असल्याचे संभाजीराजे म्हणाले.
आम्ही त्वरीत मुख्यमंत्र्यांकडे जाणार, प्रश्न मार्गी लावण्याची विनंती करणार : महापौर
संभाजीराजे यांच्या भेटीसाठी आझाद मैदानावर पोहोचलेल्या महापूर किशोरी पेडणेकर म्हणाल्या आहेत की, आम्ही त्वरीत मुख्यमंत्र्यांकडे जात आहोत. लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लागेल. आपला राग मी समजू शकते उगाच रागात आवेशात काही चुकीचं करु नका. न्याय तुम्हाला देखील मिळणार आहे.'' पक्ष प्रमुखांशी भेटणार आणि प्रश्न मार्गी लावण्यासाठी बोलणार असल्याचे पेडणेकर यावेळी म्हणाल्या आहेत.
महत्त्वाच्या बतम्या: