परभणीच्या जिंतूरमध्ये राष्ट्रवादीचे माजी आमदार विजय भांबळे आणि भाजपचे माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्या गटात आज जोरदार धुमश्चक्री झाली. आद्योगिक सहकारी संस्थेच्या निवडणुकीच्या मतदानावरून बोर्डीकर-भांबळे यांच्यात बाचाबाची झाली. यानंतर या वादातूनच दोन्ही गटांमध्ये तुफान हाणामारी झाली. यावेळी दोनी गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने घटनास्थळी जमले होते. जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमारासह अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडल्या आहेत. या राड्यात दोन पोलीस जखमी झाल्याचे समजते आहे.   


कशावरून झाला वाद? 


परभणीच्या जिंतूरमध्ये औद्योगिक सहकारी संस्थेची निवडणूक सुरू असून याचे मतदान आज होत आहे. या अनुषंगाने जिंतूर मधील जिल्हा परिषद शाळेच्या मतदान केंद्रावर भाजपचे माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर आणि आमदार मेघना बोर्डीकर यांच्या पॅनलचे व राष्ट्रवादीचे माजी आमदार विजय भांबळे यांच्या पॅनलचे टेंट समोरा समोरच टाकून तळ ठोकून होते. यावेळी मतदान केंद्राच्या 100 मीटरच्या आत का आलास म्हणून भांबळे यांनी बोर्डीकर गटाच्या एकावर आक्षेप घेतला. त्यावरून दोंघांमध्ये बाचाबाची झाली. त्यांनतर या वादाचे रूपांतर झटापटीत झाले. स्वतः रामप्रसाद बोर्डीकर आणि विजय भांबळे हे समोरासमोर आले आणि दोंन्ही गटांमध्ये धुमश्चक्री उडाली.


यावेळी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत सौम्य लाठीमार केला व जमावाला पांगवले. शिवाय अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडल्या या सर्व प्रकारात दोन पोलीस जखमी झाले असून अतिरिक्त पोलीस अधीक्षक मुक्कमा सुदर्शन हे स्वतः जिंतूरमध्ये दाखल झालेत. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त सर्वत्र तैनात करण्यात आला आहे. भाजप आमदार मेघना बोर्डीकर यांनी भांबळे दादागिरी करत असल्याचा आरोप केलाय, तर राष्ट्रवादीचे माजी आमदार विजय भांबळे यांनी बोर्डीकर गुंडगिरी करत असल्याचा आरोप केलाय.


महत्वाच्या बातम्या :