मुंबई : लोकसभा निवडणुकीनंतर (Lok Sabha Election 2024) आता विधानसभा निवडणुकीचे (Vidhan Sabha Election 2024) वेध लागले आहेत. राज्यात महायुती (Mahayuti) विरुद्ध महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) सामना रंगणार आहे. दररोज नवनवीन इच्छुक उमेदवारांची नावे समोर येत असून काही दिवसांपूर्वी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे (Sanjay Pandey) यांनी विधानसभा निवडणूक (Maharashtra Assembly Election 2024) लढवण्याची घोषणा केली होती. त्यांनतर काल त्यांनी काँग्रेस (Congress) पक्षात प्रवेश केला. यावरून भाजप नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी संजय पांडे यांच्यावर निशाणा साधला आहे. 


बेकायदेशीर फोन टॅपिंग प्रकरणात संजय पांडे यांना ईडीकडून अटक करण्यात आली होती. संजय पांडे यांचे प्रकरण बाहेर काढण्यामागे मोहित कंबोज यांनी पडद्यामागून हालाचाली केल्याची चर्चा त्यावेळी रंगली होती. संजय पांडे यांच्या जेलवारीनंतर आता मोहित कंबोज यांनी पुन्हा एकदा त्यांना आव्हान दिले आहे.


संजय पांडे सुपारी बहाद्दर अधिकारी : मोहित कंबोज


मोहित कंबोज यांनी एक्स या समाज माध्यमावर ट्विट करत संजय पांडे यांच्यावर निशाणा साधला आहे. 2022 चा हिशेब 2024 मध्ये पूर्ण करू, असे आव्हानच त्यांनी संजय पांडे यांना दिले आहे. तर दुसऱ्या ट्विटमध्ये मोहित कंबोज यांनी म्हटले आहे की, संजय पांडे हे सुपारी बहाद्दर अधिकारी होते. भाजप नेत्यांवर कारवाईसाठीच महाविकास आघाडीने संजय पांडे यांची नियुक्ती केली, अशी बोचरी टीका त्यांनी केली आहे. भाजप नेत्यांवर खोट्या केसेस टाकल्याचाही कंबोज यांनी आरोप केला आहे. तर काँग्रेस आणि संजय पांडे याला काय उत्तर देणार? याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. 






काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर संजय पांडेंची प्रतिक्रिया


काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर संजय पांडे म्हणाले की, मी विधानसभा निवडणूक लढवणार हे नक्की आहे. ⁠या संदर्भात पक्ष निर्णय घोईल. ⁠ईडी, सीबीआयचा मी ही व्हिक्टीम आहे. ⁠या संदर्भात कोर्टात केस लढेन. ⁠या प्रकरणाचा आणि काँग्रेस प्रवेश याचा काहीही संबंध नाही. 2004 पासून मला काँग्रेस मध्ये काम करायचं होतं. ⁠मात्र आता वेळ आहे म्हणून मी काम करत आहे. जागावाटपानंतर कोणत्या ठिकाणाहून लढायचं ते ठरवू, असे त्यांनी म्हटले आहे. 


आणखी वाचा 


Bhaskarrao Khatgaonkar : अशोक चव्हाणांना मोठा धक्का, मेहुणे भास्करराव पाटील खतगावकर काँग्रेसमध्ये परतणार