MNS Meeting Raj Thackeray : मुंबई : जातीपातीचं विष कालवणाऱ्यांना महाराष्ट्रातून (Maharashtra News) दूर करावं, असं मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले आहेत. तसेच, आज मनसेची बैठक पार पडली. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक असल्याचं राज ठाकरेंनी सांगितलं. तसेच, या बैठकीत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांवर काही जबाबदाऱ्या सोपवल्या असून पक्षाचे अंतर्गत विषयांवरही चर्चा झाल्याचं राज ठाकरेंनी सांगितलं. 


मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले की, "आजची बैठक पक्षांतर्गत होती. आगामी निवडणुकीच्या दृष्टीकोनातूनच आजची पक्षांतर्गत बैठक होती. या बैठकीमध्ये नेते मंडळींना कामं दिलेली आहेत." पुढे बोलताना ते म्हणाले की, सर्व समाजाला हे समजायला हवं. मी अनेकदा माझ्या भाषणामधून मुलाखतीतून सांगितलंय जातीपातीनं काहीही होणार नाही. आता हे सगळे पुढारी जातीपातीत द्वेश पसरवून फक्त मतं आता घेतील आणि भोळसटपणे हे मतं देतील देखील. पण याचा परिणाम पुढच्या येणाऱ्या पिढ्यांवर होणार आहे. काल कोणीतरी मला एक क्लिप पाठवली. लहान लहान मुलं जातीपातीवरुन एकमेकांशी बोलताना दिसली. हे आधीच बोललेलो मी हे सर्व प्रकरण शाळा, कॉलेजपर्यंत जाणार. हे विष महाराष्ट्रात कधीच नव्हतं. जातीपातीचं विष कालवणारी लोक आहेत. महाराष्ट्रानं यांना दूर ठेवलं पाहिजे. कितीही आवडता नेता किंवा आवडता पक्ष असला तरीसुद्धा असलं विष कालवणार असतील तर पुढच्या पिढ्यांचं काय होणार? महाराष्ट्राचं काय होणार? मी नेहमी सांगत आलोय, उत्तर प्रदेश, महाराष्ट्रात ज्या काही गोष्टी सुरू आहेत. तसं महाराष्ट्रात सुरू होईल, खून-खराबे सुरू होतील यावरुन."


वैयक्तिक टिप्पणी, तसेच आदित्य ठाकरेंकडून सुपारीबाज अशी टिप्पणी केली. यावर राज ठाकरेंनी उत्तर देणं टाळलं. महाराष्ट्र दौऱ्यावरही राज ठाकरेंनी टिप्पणी केली आहे. जुलैमध्ये महाराष्ट्र दौरा सुरू होणार असल्याचं राज ठाकरेंनी सांगितलं. तसेच, राज ठाकरेंनी यावेळी बोलताना मी आगामी विधानसभेत युक्रेन आणि रशिया युद्धाचा प्रचार करणार असल्याचा मिश्किल टोला राज ठाकरेंनी लगावला आहे. 


विकासापेक्षा जातीपातीमध्ये तेढ निर्माण करणं आणि त्यातून हाताला मतं लागतायत, हे त्यांना कळालं आहे. त्यामुले हे याच प्रकारे पुढे जाणार त्यामुळे समाजानं हे वेळीच ओळखणं गरजेचं आहे, असं राज ठाकरे म्हणाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बांबू बाबतच्या वक्तव्यावरही राज ठाकरेंनी भाष्य केलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काही लोकांना बांबू लावण्याची गरज आहे, असं म्हणाले होते. यावर बोलताना लावा म्हणावं, असं म्हणत थेट टोला लगावला आहे. 


पाहा व्हिडीओ : Raj Thackeray : जाती-पातीचं विष कालवणाऱ्यांना महाराष्ट्रातून दूर करावं- राज ठाकरे