Raj Thackeray On Uddhav Thackeray: ''कोरोनाच्या काळामुळे सर्व महानगरपालिकांच्या निवडणुका दोन ते अडीच वर्ष लांबणीवर गेल्या आहेत. यावर्षी मार्चमध्ये निवडणुका होतील असं वाटत होतं. मात्र मी यांना (मनसे नेत्यांना) सांगत होतो की, मला वातावरणात निवडणूक दिसत नाही आहे. आता या निवडणुका पुढे जात डिसेंबर आला. आता पुन्हा कानावर येत आहे की पुढच्या फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये निवडणुका लागतील'', असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले आहेत. गोरेगाव येथील नेस्को मैदनात आयोजित मनसे गटाध्यक्ष मेळाव्यात ते असं म्हणाले आहेत. यावेळी काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत खासदार राहुल गांधी यांना काळे झेंडे दाखवणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांचं राज ठाकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.  मनसेची आंदोलनं विस्मरणात जातील यासाठी काही जणांकडून स्वतंत्र यंत्रणा राबवण्यात येत आहेत. परंतु, मनसेच्या आंदोलनावर पुस्तिका काढणार आहे, अशी माहिती राज ठाकरे यांनी यावेळी दिली.


'शिंदे यांनी एका रात्रीत जादूची कांडी फिरवली'


मनसे गटाध्यक्षांना संबोधित करताना राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना ही लक्ष केलं आहे. ते म्हणाले आहेत की, स्वत:च्या स्वार्थासाठी कोणाचाही हात हातात घेऊन मागे जाऊन बसणाऱ्यांपैकी मी नाही. प्रकृतीचे कारण सांगून घरात बणाऱ्यांना एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी एका रात्रीत जादूची कांडी फिरवली. आजा राज्यभर फिरत आहेत. परंतु, उद्धव ठाकरे यांच्या अंगावर एक तरी केस आहे का? असा हल्लाबोल राज ठाकरे यांनी केला आहे.   


राज ठाकरे पुढे म्हणाले, ''आजपर्यंत बाळासाहेब जे बोलत आले की, मशिदींवरील भोंगे उतरवले गेले पाहिजेत. मनापासून त्यांची ती इच्छा होती. पूर्ण आपण (मनसेने) केली. याचं कारण आपण भोंगे काढायला नाही सांगितले, तर नाही काढले तर हनुमान चालीसा लावू. यामुळे हे निघाले.''  त्यांनी पुन्हा एकदा मशिदीचा मुद्दा उचलत कार्य कार्यांना सांगितलं आहे के, जिथे जोरात भोंगे वाजत आहेत. त्याची पोलिसात तक्रार करा. तसेच पोलिसांनी यावर काही केलं नाही, तर ट्रकवर स्पीकर लावून हनुमान चालीसा लावा, असं ते कार्यकर्त्यांना म्हणाले आहेत.      


संबंधित बातमी: 


Raj Thackeray Live: 'उद्धव ठाकरेंच्या अंगावर एकतरी केस आहे का?' राज ठाकरेंच्या भाषणातील 10 महत्वाचे मुद्दे