Gujarat Election 2022 : गुजरात विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्ष दोघे  एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. यातच  आम आदमी पक्ष यावेळी पूर्ण जोमाने निवडणुकीत उतरला आहे. आम आदमी पक्षाचे अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केरीवाल म्हणाले की, गुजरातला पुढे नेण्यात आमच्या उद्योगपतींचे मोठे योगदान आहे. आज व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातारण आहे. सुरतमधील आमच्या सर्व कापड व्यापारी बांधवांनी ही गोष्ट सांगितली आहे.


अरविंद केजरीवाल म्हणाले आहेत की, गुजरातमध्ये आज भीतीचे वातावरण आहे.  लोक घाबरले आहेत. मात्र या निवडणुकीत एक चमत्कार घडणार आहे. व्यापाऱ्यांना गुंडगिरी आणि भीतीपासून मुक्त करण्याचे काम आम्ही करू. आता व्यापाऱ्यांना घाबरण्याची गरज नाही. आपची सत्ता आल्यास येथील व्यापाऱ्यांना कोणी त्रास देणार नाही. पहिल्यांदाच मी असे राज्य पाहत आहे की, ज्यामध्ये सामान्य माणूस घाबरतो की मी कोणाला मतदान करतो?


केजरीवाल  म्हणाले की, 2015 मध्ये दिल्लीत 30 हजार कोटींचा महसूल होता. आज छापे न पडता महसूल 75 हजार कोटी झाला आहे. आमचे सरकार आल्यास गुजरातचाही त्याच वेगाने विकास होईल. मी गुजरातमधील सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना आश्वासन देऊ इच्छितो की, आमचे सरकार स्थापन झाल्यास 31 जानेवारीपर्यंत जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी अधिसूचना जारी केली जाईल. मी हवेत बोलत नाही. ते म्हणाले, राजकारणातील माझे भाकीत खरे ठरल्याचे अनेकजण सांगत आहेत. आज मी एक भविष्यवाणी करणार आहे. गुजरातमध्ये आम आदमी पक्षाचे सरकार स्थापन होत आहे. दिल्ली निवडणुकीत काँग्रेसला शून्य जागा मिळण्याचा अंदाज मी व्यक्त केला होता. पंजाबबद्दल मी जे काही भाकीत केले होते ते खरे ठरले.


सुरतमध्ये निवडणूक प्रचारासाठी आलेले अरविंद केजरीवाल यांनी भाजपला लक्ष करत म्हटलं आहे की, भाजपने दिल्लीत आश्वासन दिले आहे की, प्रत्येक प्रभागात व्हिडीओची दुकाने उघडली जातील. कारण भाजप ही आता व्हिडीओ बनवणारी कंपनी बनली आहे. पाहा व्हिडीओ व्हायरल करण्यासाठी ती कशी काम करतेय. केजरीवाल म्हणाले की, दिल्लीतील जनता ठरवेल की त्यांना व्हिडीओ बनवणारी कंपनी हवी की, त्यांच्या मुलांचे भविष्य घडवणारे सरकार.


इतर महत्वाच्या बातम्या: 


Sachin Ahir on Eknath Shinde : कोणाचं मानसिक आणि राजकीय संतुलन बिघडलं हे जनताच ठरवेल; सचिन अहिर यांचा मुख्यमंत्र्यांवर पलटवार