MNS and Avinash Jadhav, पालघर : ठाणे आणि पालघर जिल्ह्यात मनसेत असलेला अंतर्गत वाद विधानसभा निवडणुकीनंतर अवघ्या काही दिवसातच चव्हाट्यावर आला आहे. पालघरचे मनसे जिल्हाध्यक्ष समीर मोरे यांना जबर मारहाण करत त्यांचे बंधू आतिश मोरे यांच्यावर पंधरा ते वीस मद्यधुंद अवस्थेत असलेल्या गावगुंडानी धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केला असून हा हल्ला ठाणे मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी केल्याचा आरोप मोरे कुटुंबीयांकडून केला जातोय . 


समीर मोरे यांच्यासह भावावर धारदार शस्त्रांनी  जीवघेणा हल्ला


अविनाश जाधव यांनी आज दुपारच्या सुमारास  आपल्या पदाचा राजीनामा दिल्याच्या बातम्या प्रसारित झाल्यानंतर अवघ्या काही वेळातच बोईसरमध्ये हा सगळा धक्कादायक प्रकार समोर आला आहे . जिल्हाध्यक्ष समीर मोरे यांना लाथा बुक्क्यांनी जबर मारहाण करत त्यांचे बंधू अतिश मोरे यांच्यावर कोयते  , तलवार , चाकू अशा धारदार शस्त्रांनी  जीवघेणा हल्ला करण्यात आला असून जखमी असलेल्या मोरे यांच्यावर सध्या बोईसरच्या शगुन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 






राज ठाकरेंची भेट घेऊन पराभवाची कारण सांगितली


सध्या बोईसर पोलीस घटनास्थळी दाखल झाल्या असून त्यांच्याकडून पुढील कार्यवाही सुरू आहे . मात्र या सगळ्या घटनेमुळे पालघर आणि ठाणे जिल्ह्यात मनसेत मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या अंतर्गत वादाचा रूपांतरण थेट जीवघेण्या हल्ल्यापर्यंत गेल्यानंतर आता मनसेचे वरिष्ठ नेते काय निर्णय घेतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे . दरम्यान पालघर मधील मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी आज राज ठाकरेंची भेट घेऊन पराभवाची कारण सांगितली . यावेळी मनसे नेते अविनाश जाधव यांनी निवडणूक काळात दिलेली जबाबदारी पार पाडली नसल्याची तक्रार काही मनसे पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरे यांना केल्यानंतर राज ठाकरे यांनी अविनाश जाधव यांची कानउघाडणी केली आणि हाच राग मनात धरून अविनाश जाधव यांनी हा हल्ला केल्याचं मोरे यांच्या सहकाऱ्यांकडून सांगण्यात येते.


इतर महत्त्वाच्या बातम्या 


...तर आम्ही मनसेला सोबत घ्यायला तयार आहोत; राज ठाकरेंना मविआच्या जयंत पाटलांकडून ऑफर


दानवे म्हणाले, उद्धव ठाकरे सोबत असते तर यापेक्षा जास्त जागा आल्या असत्या; आता शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया