Raosaheb Danve on Uddhav Thackeray : " शिवसेना जर काँग्रेस राष्ट्रवादी सोबत गेली नसती तर 14 ते 19 पर्यंत सारखाच कारभार झाला असता आणि त्या कारभाराच्या आधारावर याहून अधिक जागा आल्या असत्या.  उद्धव ठाकरे सोबत असते तर आज जेवढं बहुमत मिळाले त्यापेक्षा जास्त बहुमत मिळालं असतं.. ते सोबत नाहीयेत तरी सुद्धा जास्त आल्या", असं वक्तव्य माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांनी केलंय. ते एबीपी माझाशी बोलत होते. 


रावसाहेब दानवे म्हणाले, निवडणूक समितीचा प्रमुख असल्याने मी आज भेट घेतली.  पाच तारखेला भारतीय जनता पार्टीच्या  मुख्यमंत्र्यांचा शपथविधी आहे.  आधी विधिमंडळ पक्षाची बैठक होईल नेता निवडला जाईल आणि त्यानंतर मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर केला जाईल. जसं ठरलं तसं सुरू आहे कोणताही वादविवाद आमच्यात नाही. मुख्यमंत्री कोण हा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे. मात्र आमचं मुख्यमंत्री कोण हे ठरलं आहे.  जोवर वरिष्ठांची सही होत नाही तोवर अधिकृत रित्या प्रकाशित होत नाही, असा आमचा पार्टीचा विषय आहे.


जोवर वरिष्ठांचा शिक्का बसत नाही तोवर मुख्यमंत्रिपदाचे नाव माहित असलं तरी जाहीर होणार नाही. सगळं ठरल्याप्रमाणेच होणार आहे. प्रसंग, वेळ पाहून आम्ही सगळं करत असतो. वेळही ठरवली आहे, तारीखही ठरवली आहे. जो कोणी आमचा नेता निवडला जाईल तो आमचा मुख्यमंत्री असेल. सगळं ठरलं आहे बॉसचा शिक्का झाला की सगळं समजेल, असंही दानवे यांनी स्पष्ट केलं. 


पुढे बोलताना रावसाहेब दानवे म्हणाले, कार्यकर्ते त्यांच्या प्रमाणे अनेक गोष्टी करत असतात त्याला आमची मान्यता नसते. रक्ताने पत्र लिहिण्याने कोणी मुख्यमंत्री होत नाही. एकनाथ शिंदे बिलकुल नाराज नाहीत. केवळ वर्तमानपत्र आणि चॅनलला चाललेली बातमी आहे.  ते स्वतःच्या गावी गेले आहेत शंका उपस्थित करण्याचा प्रश्न नाही.  त्यांना ताप आलाय आरामाचा सल्ला दिलाय त्याच्यावर देखील शंका उपस्थित केली जाते आहे. संजय राऊत म्हणतात त्यांचा चेहरा पडला पण हे सारेच पडलं तरी आम्ही त्यांच्याबद्दल बोलत नाही.  त्यांना रुग्णालयात ऍडमिट करण्याची गरज आहे.


जे जे बोलतात ते खोटं ठरलं. त्यांच्या वागण्यामुळे शिवसेना फुटली आता ते उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंमध्ये भांडण लावत आहेत.  जे काही झालं ते त्यांच्या मुले झालं आहे.  भाजप शिवसेना एकत्र राहिली असती तर यापेक्षा जास्त बहुमत मिळालं असतं. उद्धव ठाकरे यांची वाट भरकटवली. जर उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांच्यामध्ये भांडण झाले तर कारण संजय राऊत असतील, असा टोलाही रावसाहेब दानवे यांनी लगावला. 


इतर महत्त्वाच्या बातम्या 


ज्या पक्षाकडे मुख्यमंत्रीपद त्यांच्याकडेच आत्तापर्यंत गृहमंत्रीपद आहे; अमोल मिटकरींचा दावा, शिवसेनेला चिमटा