Gopichand Padalkar on Supriya Sule : शरद पवार (Sharad Pawar) हे जातीयवादाचं विद्यापीठ आहे. सुप्रिया सुळे (Supriya Sule) या लहानपणीपासून त्यांच्याकडूनच हे सगळं शिकल्या असल्याची जहरी टीका भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar)यांनी केलीय. लिंबाच्या झाडापासून गोड फळांची अपेक्षा करुच नका. जसा बाप तशीच लेक असं म्हणत पडळकरांनी शरद पवारांसह सुप्रिया सुळेंवर जोरदार निशाणा साधला.
सुप्रिया सुळे त्यांच्यातली 'किडकी बहिण' महाराष्ट्राला दाखवतायेत, पळकरांची टीका
सुप्रिया सुळे या अजित पवार यांच्याबद्दल सहानुभूती दाखवू नका असं बोलतात. अजित पवार तिकडं लाडकी बहिण योजनेसाठी राज्यभरात फिरत आहेत. पण इथं सुप्रिया सुळे त्यांच्यातली 'किडकी बहिण' महाराष्ट्राला दाखवत असल्याचे गोपीचंद पडळकर म्हणाले. मनोज जरांगे पाटील, एकनाथ शिंदे आणि शरद पवार हे तिघही मराठा आहेत, म्हणून जरांगे शिंदेंबद्दल बोलायच नाही असं सुप्रिया सुळे बोलल्या असल्याचे पडळकर म्हणाले. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आता यात वेळीच हस्तक्षेप करायला पाहिजे. कारण, मुख्यमंत्र्यांचे नाव घेऊन इथं महायुतीत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचे पडळकर म्हणाले.
देवेंद्र फडणवीस यांना केवळ ब्राम्हण आहेत म्हणून लक्ष्य केलं जातंय
जरांगे-शिंदे यांच्याशी वैर नाही, पण देवेंद्र तुझी खैर नाही!" असे संदेश देणारे लोक देवेंद्र फडणवीस साहेबांना केवळ ब्राम्हण आहेत म्हणून लक्ष्य करत असल्याचे गोपीचंद पडळकर म्हणाले. महाराष्ट्राला जातीयतेच्या आगीत झोकणारे शरद पवार पुरोगामी मुखवटा घालून जातीवादाचे विष महाराष्ट्रात पसरवत असल्याची जहरी टीका पडळकर यांनी यावेळी केली. फडणवीस यांना जाणीवपूर्वक टार्गेट केलं जात असल्याचे पडळकर म्हणाले. पवारांचा एक फॉर्म्युला आहे. पुरोगामीपणाच्या बाता मारायच्या आणि जातीयवादावर चर्चा घडवायच्या असे पडळकर म्हणाले. देवेंद्र फडणवीस तुम्हाला पुरुन उरले आहेत. ते कशातच सापडत नाहीत म्हणून त्यांच्या जातीवर बोलायचे असेही पडळकर म्हणाले. लहानपणापासून सुप्रिया सुळे या शरद पवार यांच्याकडून शिकल्या आहेत. शरद पवार हे जातीयवादाचं विद्यापीठ असल्याचे पडळकर यावेळी म्हणाले. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव घेऊन महाराष्ट्रात संभ्रमाचे वातावरण निर्माण केलं जात असल्याचेही गोपीचंद पडळकर म्हणाले. त्यामुळं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत हस्तक्षेप करावा असेही जरांगे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या: