मुंबई : दिशा सालियान प्रकरणावरुन आज सभागृहात चांगलाच वादंग झाल्याचं पाहायला मिळत आहे. सत्ताधारी आणि विरोधकांकडून दिशा सालियान प्रकरणावर जोरदार खडाजंगी सुरू आहे. सत्ताधाऱ्यांकडून नाव न घेता थेट शिवसेना आमदार आदित्य ठाकरेंना लक्ष केलं जात असून विरोधी पक्षातील आमदार ठाकरेंच्या बाजुने मैदानात उतरले आहेत. शिवसेना उबाठा पक्षाचे आमदार अनिल परब (Anil Parab) यांनी याप्रकरणी विधानपरिषदेत बोलताना मंत्री संजय राठोड यांचा प्रश्न उपस्थित केला. त्यावेळी, त्यांनी आमदार चित्रा वाघ यांचं नाव घेतल्याने चित्रा वाघ चांगल्याच संतापल्याचं पाहायला मिळाल्या.  महायुतीमधील मंत्री संजय राठोड, जयकुमार गोरे यांच्या केसबाबत कोणी बोलत नाही, त्यांचा राजीनामा घ्या, विरोधीपक्ष कमजोर आहे म्हणून त्याला कसंही दाबू नका, असे म्हणत अनिल परब यांनी सरकारला लक्ष्य केलं. तसेच, चित्रा वाघ यांच्यावरही निशाणा साधला. त्यानंतर, चित्रा वाघ (Chitra wagh) यांनी संताप व्यक्त करत, मी 56 परब पायाला बांधून फिरते, असे म्हटले.

Continues below advertisement


संजय राठोड का मंत्रिमंडळात आहेत त्याचे उत्तर दिलं आहे. उद्धव ठाकरेंना विचारा, संजय राठोड यांना का क्लिनचिट दिली,असेल हिंमत तर विचारा त्यांना, अशा शब्दात आमदार चित्रा वाघ यांनी सभागृहात शिवसेना उबाठाचे आमदार अनिल परब यांच्यावर पलटवार केला. तसेच, माझं नाव घेऊन बोलण्यात आलं त्यामुळे मी अनिल परब यांना उत्तर देत आहे. तुम्ही असाल पोपट पंडित, माझ्या कुटुंबानं दोन वर्ष जे सहन केलं, तुमच्यासारखे 56 परब पायाला बांधून फिरते, आम्ही वशिल्याने इथं आलेलो नाही आहोत, असे म्हणत चित्रा वाघ यांनी सभागृहात अनिल परब यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. 


मुद्द्यावर बोला, कुटुंबावर येऊ नका


अनिल परब यांना सांगायचं आहे, संजय राठोड प्रकरणात चित्रा वाघ लढतच होती, मी लढाई लढली आहे. पण, कोणी क्लिनचिट दिली, जे समोर आलं त्यावर मी भूमिका मांडली. मी कोर्टात गेले आणि काय काय सहन नाही करावं लागलं, असे म्हणत चित्रा वाघ यांनी भूतकाळ सांगितला. आम्हाला हलक्यात घेऊ नका, बोलायला लागलो तर समोरच्या सीट खाली होतील. एसआयटी रिपोर्ट येऊ द्या बोललो तर यांची ही हालत आहे. मुद्द्यांवर बोला, कुटुंबावर येऊ नका. आमचा नवरा, मुलगा काय करतो त्यावर काय येता असेही वाघ यांनी सभागृहात बोलताना म्हटले. 



मी उद्धव ठाकरेंना विचारायला येते


दरम्यान, उद्धव ठाकरेंनी मी विचारायला  येते, मी पत्रकारांना विचारते, संजय राठोड यांना कोणी दिली क्लीनचिट?. माझा आणि अनिल परब यांचा काडीचा देखील संबंध नाही. मात्र, ते बोलले म्हणून मी बोलले, असेही चित्रा वाघ यांनी बोलताना स्पष्ट केलं.  


हेही वाचा


मोठी बातमी : राज्यातील सरकारी शाळांना CBSE अभ्यासक्रम लागू, शिक्षणमंत्र्यांची सभागृहात घोषणा