Girish Mahajan on Eknath Khadse : एकनाथ खडसेंनी (Eknath Khadse) भाजपमध्ये प्रवेश केला हे कोणालाच माहिती नाही, असं म्हणत मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी खडसेंना टोला लगावला.  राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा दिला हे सुप्रिया सुळे, जयंत पाटील, शरद पवार यांनाही माहित नाही. मग नेमकं काय चाललंय? हे एकनाथ खडसेंना विचारा ते सांगू शकतील असं महाजन म्हणाले.  


जरांगे पाटील यांच्यावर मी काय बोलू?


एकनाथ खडसे म्हणतात भाजपात आलो. पण ते भाजपात आले याबाबत मला माहिती नसल्याचे माजन म्हणाले. मलाही समजत नाही एकनाथ खडसे नेमकं कुठे? याबाबत मी पण गोंधळलेलो असल्याचे महाजन म्हणाले. बदलापूर येथील आंदोलनाला राजकीय आंदोलन म्हणत असाल तर तुम्हाला लाज वाटली पाहिजे अशी टीका मनोज जरांगे पाटील यांनी केली होती. त्यांच्या या टीकेला गिरीश महाजन यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. जरांगे पाटील यांच्यावर मी काय बोलू? सर्वेच म्हणतायेत आंदोलनात जे पोस्टर बॅनर आले ते कोणाचे होते? आंदोलनात माझी लाडकी बहीणचे पोस्टर घेऊन सहा-सात तास चार-पाच जण उभे होते. पोस्टर घेणारे कोण होते त्यांची आम्ही चौकशी करतो आहोत. ते कुठले होते इतके सुंदर बोर्ड कुठून आले? त्याची आम्ही चौकशी करत असल्याचे महाजन म्हणाले. आंदोलनात गोंधळ घालणारे लोक कुठले होते हे आम्ही बघितल्याचेही ते म्हणाले.  या घटनेच्या मागे अनेक लोकांनी आपले पोळी शेकण्याचं काम केलं आहे. घटना इतकी गंभीर आहे. मात्र, त्याच गांभीर्य या लोकांना राहिला नाही. फक्त राजकारण म्हणून काही लोक या घटनांकडे बघत होते असंही महाजन म्हणाले.


सुषमा अंधारेंसह संजय राऊतांवर टीका


सुषमा अंधारे व संजय राऊत यांना उठता बसता फक्त सत्ताधारी दिसत आहेत. आता चित्र बदललेला आहे विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरली असल्याचे महाजन म्हणाले. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे त्यांनाही आता कळायला लागलेला आहे ही काय होईल. म्हणून वाटेल ते बेछूट आरोप सुषमा अंधारे करत असल्याचे महाजन म्हणाले. 


बदलापूर प्रकरणात फास्टट्रॅक कोर्टात केस दाखल 


बदलापूर प्रकरणात फास्टट्रॅक कोर्टात केस दाखल केलेली आहे. यामध्ये ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले, त्यांना तात्काळ निलंबित करण्यात आलं आहे. विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. शाळेचे मुख्याध्यापक व दोन कर्मचारी त्यांना निलंबित करण्यात आलेलं आहे. ज्या ज्या मागण्या होत्या त्या सर्व पूर्ण करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे कुणाची शाळा कोणाची लपवालपी करायची असं होऊ शकत नाही असे महाजन म्हणाले.  


सुप्रिया सुळे टीकेला महाजनांचे प्रत्युत्तर 


महाविकास आघाडीची ताकद वाढली म्हणूनच पंतप्रधानांना जळगावच्या दौऱ्यावर यावं लागते, अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली होती. त्यांच्या या टीकेला गिरीश महाजनांनी  प्रत्युत्तर दिलं आहे. तुमचे मुख्यमंत्री तसे घरात बसणारे होते, तसे आमचे पंतप्रधान आहेत का? पंतप्रधान एकही मिनिटं आराम करत नाही. एकही दिवस सुट्टी घेत नाहीत 365 दिवस काम करतात असे महाजन म्हणाले. निवडणूक असो का नसो जेवढा वेळ शिल्लक असेल त्यात नरेंद्र मोदी देशभर दौरे करतात. तुमच्या नेत्यात आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात जमीन आसमानचा फरक आहे. नरेंद्र मोदी हे आज फिरत नाहीत, तर गेले दहा वर्ष त्यांच्या एवढा प्रवास कोणत्याही पंतप्रधानांनी केला नाही असे महाजन म्हणाले. निवडणुकीत कळेल की आपली ताकद काय आहे. पंतप्रधान येतीलच मात्र तुम्हाला एवढी पोटदुखी का ? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. 


शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवण्याचे आदेश


शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे मंत्री गिरीश महाजन म्हणाले.  शाळांमध्ये सीसीटीव्ही बसले पाहिजे याची आवश्यकता आहे. अशा घटना घडता कामा नये. अशा घटना घडू नये यासाठी सीसीटीव्ही हे प्रभावी साधन असल्याचे महाजन म्हणाले. त्याच्यावरती निगराणी मात्र सर्वांची असली पाहिजे त्याशिवाय या घटनांना आपण थांबवू शकणार नाही. विकृतीही दूर झाली पाहिजे, कारण एखादा विकृत असेल तर कॅमेरा असून देखील काहीही करू शकतो. यासाठी जे जे काही करण्यासारखं आहे, त्यासंदर्भात शासन निर्णय घेईल व त्याची अंमलबजावणी लवकरच होईल असे महजान म्हणाले. 


महत्वाच्या बातम्या:


Girish Mahajan : आंदोलकांना 8 वेळा समजावलं, काही जणांना राजकारण करायचं होतं, लाठीचार्जनंतर गिरीश महाजन स्पष्टच बोलले