Dharashiv: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जिल्ह्यात आलेल्या प्रत्येक नेत्याला घेराव घालत मराठा आरक्षणाची मागणी रेटण्याची मराठा आंदोलकांची पद्धत आजही कायम राहिली असून धाराशिवच्या परंड्यात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही मराठा आंदोलकांनी अडवल्याचे दिसून आले. धाराशिवच्या हातलाई मंगल कार्यालयात पक्षमेळाव्यासाठी मुख्यमंत्री आले असता मराठा आंदोलकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसमोर घोषणाबाजी केली.
राज्यात एकीकडे विधानसभा निवडणूका तर दुसरीकडे मराठा आरक्षणाचा प्रश्न असा दुहेरी पट मोठा चर्चेचा विषय झाला असून राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना अडवण्यापासून सुरु झालेला नेत्यांच्या अडवाअडवीचा ट्रेंड मुख्यमंत्र्यांच्या धाराशिव दौऱ्यातही पहायला मिळाला.
हैद्राबाद गॅझेट लागू करण्याची मागणी
धाराशिवमध्ये लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमासाठी आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना थांबवत मराठा आंदोलकांनी थांबवत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. मराठा आरक्षणासाठी हैद्राबाद गॅझेट वापरण्याची मागणी यावेळी करण्यात आली असून आरक्षणाचा प्रश्न तात्काळ सोडवावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही मराठा आंदोलकांचे म्हणणे ऐकून घेतले असून त्यांचे निवेदन स्विकारले.
मुख्यमंत्र्यांना अडवत मराठा आंदोलकांची घोषणाबाजी..
धाराशिव शहरात पक्षमेळाव्यासाठी आलेल्या मुख्यमंत्र्यांना हातलाई मंगलकार्यालयात जाताना मराठा आंदोलकांनी अडवले. यावेळी मराठा समाजातील तरुणांकडून घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी हैद्राबाद गॅझेट लागू करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी आंदोलकांना ५ मिनिटं देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आंदोलकांचे म्हणणे ऐकून घेत निवेदन स्विकारले.
मनोज जरांगेंनी केली भूजबळांवर गंभीर आरोप
मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. "ज्यावेळी अंतरवाली सराटीत दगडफेक झाली. त्यानंतर जो लाठीचार्ज झाला. त्यावेळी मनोज जरांगे तिथून निघून गेला होता. रात्री दोन वाजता राष्ट्रवादीचे दोन आमदार तिथे गेले. एक स्थानिक आमदार आणि रोहित पवार तेथे गेले. या दोघांनी परत तिथे आणून त्याला बसवला", असा दावा मंत्री छगन भुजबळ यांनी केला होता. आता मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.