Sharad Pawar and Maratha Protest : शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते विश्वास बारबोले यांनी बार्शीत 'शेतकरी संवाद मेळाव्याचे' आयोजन केले होते. या मेळाव्याला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar), माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि आमदार रोहित पवारही (Rohit Pawar) उपस्थित होते. दरम्यान, शरद पवारांचे भाषण सुरु असतानाच मराठा आंदोलकांनी काळे झेंडे दाखवल आहेत. त्यापूर्वी बार्शीकडे (Barshi) जात असताना कुर्डूवाडीमध्येही मराठा आंदोलकांनी शरद पवारांना आरक्षणाच्या प्रश्नावर जाब विचारला होता. 


 तरुण पिढीला हाताला काम दिलं पाहिजे


या सभेत बोलताना शरद पवार म्हणाले, आज या देशातील शेतकऱ्यांना घामाची कष्टाची किमत मिळत नाहीये.  म्हणून जीव द्यायची वेळ आलेली आहे.  माझ्याकडे जेव्हा कृषी खात्याची जबाबदारी होती तेव्हा कोट्यावधीचे कर्ज माफ केले. शेतकऱ्यांना दोन पैसे जास्त कसे मिळतील याची काळजी घेत होतो. आज मोदी साहेबांचे राज्य, या सत्तेचा उपयोग शेतकरी आणि शिकलेला तरुण नोकरी मिळतं नसेल. तर निराश तरुण आपल्याला देशभरात दिसतय. जिथे तरुण निराश असतो तिथल्या देशाचे चित्र ही नैराश्य दिसतं. तरुण पिढीला हाताला काम दिलं पाहिजे.  लोकसभेच्या निवडणुका झाल्या तुमच्या सारख्या लोकांनी जादू दाखवली.  चारशे पार म्हणणाऱ्यांना तीनशे पार जाता आली नाही. त्यांना दुसऱ्याची मदत घेऊन सरकार स्थापन करावे लागले, असंही शरद पवारांनी सांगितलं. 


मराठी अस्मितेसाठी लढला तोच आता दिल्लीचे आदेश घेऊ लागलाय


रोहित पवार म्हणाले, जो पक्ष मराठी अस्मितेसाठी लढला तोच आता दिल्लीचे आदेश घेऊ लागलाय.  या काळात लोकशाही दाबण्यासाठी जरं त्यांनी सुपारीच घेतली असेल आणी भाजप बरोबर राहूनच मनसेला काम करायचे असेल तर तो त्यांचा विषय  आहे. केवळ मनसे नाही तर असे अनेक पक्ष आहे जे दिल्लीचे आदेश घेऊन मताचे विभाजन होऊन महायुतीला फायदा होईल, असे वक्तव्य करतायत.  


लोकशाही टिकवणारी जे पक्ष आहेत, सत्तेत कोण आणि विरोधक कोण हे त्या कार्यकर्त्यांना माहिती नसेल.  पण आम्ही लोकशाही मानणारी लोकं आहोत, पवार साहेब शेतकरी आणि सामान्यना विषय पूढे नेऊन नेले. राजकीय रणनीती आहेत, योग्य वेळी आम्ही सांगू . मी कर्जत जामखेड सोडू शकत नाही.  मी तिथूनच लढणार.  मी कर्जत जामखेड करानी लढायला शिकवलं, मी तिथूनच लढणार आणि भल्या भल्या लोकांना भिडणार आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Pune News : कारमध्ये आमदार बसलेत, तरी सायरन वाजवायला कोणी परवानगी दिली? शिवसेना आमदार किशोर दराडेंना पुणेरी भाषेत पुणेकरानं सुनावलं!