Manoj Jarange on Maharashtra Assembly Election 2024 : जे समाजाला अपेक्षित आहे तेच होणे महत्वाचे आहे. केवळ गर्दी जमली की परिवर्तन होतं असं नाही. प्रत्यक्षात गाठी-भेटी होतं राहतात. त्यातून निर्णय होणे महत्वाचे आहे. परिणामी हल्ली इतके भावी आमदार झाले आहेत की मला निवडणूक लढवण्यासाठी मतदारसंघच शिल्लक राहिला नाही. असा मिश्किल टोला मनोज जरांगे पाटील यांनी लगावला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) निवडणुकीच्या रिंगणात आपले उमेदवार उभे करण्याच्या विचारात आहेत.


याबाबत येत्या 30 ऑक्टोंबर ला अंतरवाली सराटी (Antarwali Sarati) येथे बैठक पार पडणार आहे. या बैठकीअंती जरांगे पाटील आपली भूमिका जाहीर करणार आहेत. त्यापूर्वी जरांगे पाटलांना भेटण्यासाठी वेगवेगळ्या पक्षातील नेतेमंडळी आणि पदाधिकारी येत आहेत. अशातच मनोज जरांगे पाटील हे कुठल्या मतदारसंघातून निवडणूक लढतील? असा प्रश्न केला असता त्यांनी हा मिश्किल टोला लगावत उत्तर दिले आहे.


व्यक्तिगत निर्णय समाजावर लादणार नाही


माझी भूमिका पहिल्यापासूनच स्पष्ट आहे. राजकारणात मला पडायचं नसून निवडणूक लढण्याचा प्रश्नच उभा राहत नाही.  आपण दिलेला शब्द पाळतो. आपल्या समाजाला न्याय मिळावा यासाठी माझे प्रामाणिक प्रयत्न सुरू आहेत. रात्रंदिवस मेहनत करून  समाज एक संघ कसा राहील यासाठी प्रयत्न करत आहोत.  समाजाचा अपमान होईल अशा कुठल्याही पाऊल मी उचलणार नाही. किंबहुना समाजाची गर्दी होत असली तरी व्यक्तिगत निर्णय समाजावर लादणार नाही. असेही मनोज जरांगे पाटील म्हणाले. राजकीय समीकरण जुळलं तर समाजाचा विजय आहे. कुठल्याही एका जातीच्या आधारावर निवडणूक लढता येत नाही. या देशात अशा पद्धतीने कोणीही निवडणूक लढू शकत नाही ही अक्कल ही मला आहे. असेही ते म्हणाले.


राजकीय समीकरण जुळणे फार महत्त्वाचे


राज्याच्या राजकारणात राजकीय समीकरण जुळणे फार महत्त्वाचे आहे. कुठलाही एका जातीच्या आधारावर निवडणूक लढवल्या जात नाही. गेल्या पंधरा-वीस दिवसांपासून आमचे समीकरण जुळवणे सुरू आहे. येत्या 30 तारखेला त्या अनुषंगाने बैठक असून या बैठकीत काय होतं हे बघू. तसेच राज्यातील बांधवांना ही सूचना केल्या आहेत की अंतरवाली सराटीत 29-30 तारखेला गर्दी करू नका. पण इथे गर्दी केल्याने मला काहीही सुचत नाही. निर्णय प्रक्रिया पूर्ण झाल्यावर ठरवलं जाईल. एकंदरीत समाजाचे वाटोळ होईल असा निर्णय मला घ्यायचा नाही. असे ही मनोज जरांगे पाटील म्हणाले.


महत्वाच्या बातम्या:


शिंदे गटाच्या आमदारांच्या मनोज जरांगेंशी गाठी भेटी वाढल्या, उदय सामंतानंतर संजय शिरसाट भेटीला