Manoj Jarange Patil on Chhagan Bhujbal : तो येवलावाला म्हणतो की आम्ही 60 टक्के आहे. तू काय आम्हाला बधीर समजतो की काय? त्यानंतर म्हणे एसटी फुल भरलेली आहे. मी म्हटलं मला दार उघडू दे. त्या एसटीमध्ये एकटाच तंगड्या लांबून बसला आहे, तुला तंगडीसकट बाहेर ओढतो, अशा शब्दात मराठा आंदोलनकर्ते छगन भुजबळ यांच्यावर हल्लाबोल केला.  छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या सभेत मनोज जरांगे पाटील यांनी जोरदार हल्लाबोल केला.4 जूनला सगळ्यांनी अंतरवाली सराटीकडे या एवढेच आवाहन करतो. करण आरक्षण घेतल्याशिवाय यांना सुट्टी द्यायची नाही. आणि मला उपोषण मागे घेण्याचा आग्रह कोणीही करू नका. करोडोच्या संख्येने मराठ्यांनी एकत्र या. माझा एकच स्वप्न आहे की करोडो मराठ्यांची लेकरं मोठी झाली पाहिजेत, असे आवाहन त्यांनी केले. 


ओबीसी महामंडळ 80 टक्के तुम्ही खाल्लं 


भुजबळांवर हल्लाबोल करताना ते म्हणाले की, तुझी नियत चांगली नाही, तुला फक्त खायची सवय लागली आहे. ओबीसी महामंडळ 80 टक्के तुम्ही खाल्लं आहे. तुमच्या आरक्षणाला धक्का लागत नाही, तरी त्यांचाच सगळ्यात जास्त मराठा आरक्षणाला विरोध आहे. वंजारी आणि धनगर बांधवांना आपल्या आरक्षणाचा धक्का लागत नाही, तरीही तुम्ही त्यांना तुमच्या सभेला बोलावता असे जरांगे म्हणाले. 



धनगर आणि मुस्लिम बांधवांच्या आरक्षणासाठी लढायचं  


जरांगे पाटील म्हणाले की, धनगर आणि मुस्लिम बांधवांनाही आरक्षण कसा मिळत नाही हे सुद्धा मी बघतो. मराठ्यांनी आपला ज्वलंत प्रश्न सुटल्यानंतर धनगर आणि मुस्लिम बांधवांच्या आरक्षणासाठी लढायचं आहे. सरकारला सुद्धा असे लक्षात आले की, हा असाच राहिला तर गोरगरीब मराठे, मुस्लिम, दलित 12 बलुतेदार हे लोक सत्ता घालवल्याशिवाय राहणार नाही. 


आता हे मला जेलमध्ये टाकतील


मनोज जरांगे पाटील शिंदे फडणवीस सरकारवर बोलताना म्हणाले की, सरकारने माझ्याविरुद्ध अटक करण्याचा डाव रचला माझ्यावर एसआयटी नेमली. आता हे मला जेलमध्ये टाकतील. दुसरा एक रोज माझ्यावर दोन-तीन गुन्हे दाखल करत रात्रीतून तडीपार करायचं. मी तडीपार होऊन दुसऱ्या राज्यात जरी गेलो, तरी या राज्यातले मराठी त्या राज्यात बोलावून मोर्चे काढेन, असा निर्धार बोलून दाखवला. मी जेलमध्ये सडेल, पण मागे हाटणार नाही. जेलमध्ये सुद्धा सगळे मराठ्यांचे कैदी एकत्र करीन आणि मोर्चा काढून मी माझं जीवन समाजासाठी समर्पण केलं आहे, असे  त्यांनी सांगितले. 


सहा करोड मराठ्यांचा आग्या मोहोळ गप्प बसणार नाही 


त्यांनी  सांगितले की, फडणवीस आणि शिंदे साहेब तुम्ही मला जेलमध्ये टाकता, पण हे सहा करोड मराठ्यांचा आग्या मोहोळ हे गप्प बसणार नाही. असे स्वप्न तुम्ही अजिबात बघू नका. गोडी गुलाबीने प्रश्न मार्गी लावा, सगेसोयऱ्यांची अधिसूचना तुम्ही काढून अंमलबजावणी करा, अशी मागणी त्यांनी केली. तुम्ही आंदोलन हलक्यात घेतला, राजकारणात हलक्यात घेऊ नका, नाही तर सगळ्यांची टांगे पलटी करीन त्याशिवाय शांत बसणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. 


तुमच्या जीवावरच नेते लोक डेरिंग करत आहेत 


मला आणि माझ्या समाजाला राजकारणात नाही जायचं फक्त आमचं आरक्षण आम्हाला द्या. कोणत्याही नेत्याच्या पुढे पुढे करू नका, तुमच्या मुलांना शिकवा, अधिकारी करा तुमच्याच लेकरांच्या मागे मागे पळतील हे लोक असे आवाहन त्यांनी केले. नेत्याला आणि त्याच्या मुलाला मोठं करण्याचे स्वप्न बंद करा, तुमच्या जीवावरच नेते लोक डेरिंग करत आहेत, त्यामुळे तुम्ही थोडं अंग काढून घ्या मग कसं होतं पहा. तुमच्या जीवाच्या मतांवर हे लोक दोन दोन कोटीच्या गाडीत बसायला लागले त्यामुळे तुम्ही यांच्या पुढे पुढे करू नका ,नेत्यांचा मुलगा परदेशात शिकायला जातं आणि तुम्ही त्याच्या मुलाला आदराने भैया म्हणतात. ते मात्र तुमच्या मुलांना काही म्हणतात. निवडणूक आल्यावर हे लोक चपलासकट पाय पडतात. मात्र, निवडणूक झाल्यानंतर कुठे गुल होतात तेच कळत नाही, अशी टीकाही त्यांनी केली. 


इतर महत्वाच्या बातम्या