Manoj Jarange Patil, जालना  : महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मंत्रालयाच्या तिसऱ्या मजल्यावरुन जाळीवर उडी मारली. नरहरी झिरवाळ यांच्यासह आणखी काही आदिवासी आमदारांनी देखील उडी मारली होती. राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी धनगर आणि धनगड एकच असल्याचा जीआर काढणार असल्याचे आश्वासन राज्य सरकारने दिले आहे. या जीआरला विरोध करण्यासाठी झिरवाळ यांच्यासह काही आदिवासी आमदारांनी निषेध नोंदवला आहे. दरम्यान याबाबत आता मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 


मनोज जरांगे म्हणाले, मराठ्यांचे काही मंत्री, खासदार, आमदार मराठ्यांकडे लक्ष देत नाहीत. मरणाचा पैसा गरिबांच्या जीवावर कमावला. आता त्यांना गरिबांची गरज नाही. झिरवळ साहेब जातवान आहेत, त्यांना गरिबांची गरज आहे. झिरवळ साहेब आधी त्यांच्या जातीला किंमत देतात. आमच्यात काही जातवान नाहीत, त्यांना नेता आणि पक्ष लागतो, गरिबांची गरज नाही. मराठा आरक्षणावर न बोलणाऱ्या मराठा नेत्यांना यावेळी मराठा समाज बुक्का लावणार आहे, असा इशाराही मनोज जरांगे यांनी आमदारांना दिला. 


मराठा आरक्षणावर न बोलणाऱ्या मराठा नेत्यांवर जरांगेंची टीका  


पुढे बोलताना जरांगे म्हणाले, मराठ्यांचे काही मंत्री, खासदार, आमदार मराठ्यांकडे लक्ष देत नाही अशी खंत मनोज जरांगे यांनी बोलून दाखवलीय. मरणाचा पैसा गरिबांच्या जीवावर कमावला, आता त्यांना गरिबांची गरज नाही असं म्हणत जरांगे यांनी मराठा आरक्षणावर न बोलणाऱ्या मराठा नेत्यांवर निशाणा साधलाय. झिरवळ साहेब जातवान आहेत, त्यांना गरिबांची गरज आहे अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे यांनी दिलीय. झिरवळ साहेब आधी त्यांच्या जातीला किंमत देतात असं म्हणत आमच्यात काही जातवान नाही अशी खंत जरांगे यांनी बोलून दाखवलीय. यावेळी मराठा आरक्षणाबाबत न बोलणाऱ्या मराठा समाजाच्या नेत्यांना मराठा समाज बुक्का लावणार आहे, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिलाय.


नरहरी झिरवाळ यांच्यावर राज ठाकरेंची टीका 


दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नरहरी झिरवाळ यांच्यावर टीका केलीये. "सत्ताधारी पक्षाचे आमदार आणि विधानसभेचे उपाध्यक्ष श्री. नरहरी झिरवळ यांनी आणि इतर दोन आमदारांनी , आदिवासी समाजवर होणाऱ्या अन्यायाकडे लक्ष वेधून घेण्यासाठी मंत्रालयात संरक्षक जाळीवर उड्या मारून, म्हणे यांनी निषेध नोंदवला. हा कुठला निषेध ? सत्तेशिवाय राहू शकत नाही, असं म्हणणं शक्य नव्हतं, म्हणून 'जनतेच्या सेवेला सत्ता हवी', म्हणत तुम्हीच आणि तुमच्या सरदाराने सत्तेच्या जाळ्यात उड्या मारल्या होत्यात ना?" असा सवाल राज ठाकरेंनी केलाय. 


इतर महत्त्वाच्या बातम्या 


शांत झोप लागावी म्हणून भाजपात गेले होते, महाविकास आघाडीतही शांत झोप लागेल याची खात्री देतो, राऊतांकडून हर्षवर्धन पाटलांची फिरकी