Manoj Jarange Patil, Jalna : "मुख्यमंत्र्यांना मी आजही चांगलं मानतो. इथून पुढेही मानणार आहेत. मात्र त्यांचे ओएसडी लोकांना घेऊन दिल्लीला पळत आहेत. मुंबई संपली आता दिल्लीला पळत आहेत. आम्हाला सर्व समजतं. मला बदनाम करण्यासाठी किंवा मराठ्यांना बदनाम करण्यासाठी काय साचा बनवून आणला असेल. मुख्यमंत्र्यांच्या ओएसडीने अजून काय नवीन षडयंत्र रचले काय माहिती ?काय काय आमच्या बांधवांना ते दिल्लीला घेऊन जाऊ लागलेत. मुख्यमंत्री मराठ्यांचे आहेत, त्यांचे ओएसडी मात्र त्यांच्या जातीकडून ओढतेत. हसून खेळून गोड बोलतेत पण मराठ्यांचा कार्यक्रम लावलेत. त्या ओएसडीला म्हणतो कशाला मराठ्यांच्या अन्नात तेल ओततो. गपचूप राहा. थोडा दिवसांत सगळं उघडं पडलं", असे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील म्हणाले. जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे. दरम्यान आज त्यांनी पत्रकार परिषद घेत त्यांच्या मागण्या पुन्हा एकदा मांडल्या आहेत. 


किती दिवसांत सगे-सोयऱ्यांची अंमलबजावणी करणार आहात? 


मनोज जरांगे पाटील म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याचे लोक इथे पाठवून सांगावे की, किती दिवसांत सगे-सोयऱ्यांची अंमलबजावणी करणार आहात. लगेच करणार आहेत की किती दिवसांत करणार? हे सांगावे. गुन्हे किती दिवसांत मागे घेणार आहेत, तेही सांगावे. मराठा आणि कुणबी एकच आहेत, हा कायदा पास करण्यासाठी आधाराची गरज होती. आता 57 लाख कुणबी नोंदी मिळालेल्या आहेत. ते किती दिवसांत करणार आहात. ते प्रत्यक्षात कळायला पाहिजे. आमचा आणि आमच्या समाजाचा राजकारण हा विषय नाही. आम्हाला केवळ आरक्षण पाहिजे, असंही जरांगे यांनी सांगितलं. 


मला माझ्या समाजाला आरक्षण पाहिजे, ते कोणीही द्या


पुढे बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, मला माझ्या समाजाला आरक्षण पाहिजे. ते कोणीही द्या. आमचा शिंदे साहेबांवरती सरकारवरती आजही विश्वास आहे. देवेंद्र फडणवीस हे शत्रू नाहीत. जातीच्या आणि आरक्षणाच्या विरोधात बोलले की मी कोणाचे खपवून घेत नाही. त्यांनी हे सर्व बंद करावं ते काय माझे शत्रू आहेत का? असा इशाराही जरांगे पाटील यांनी दिला आहे. 





इतर महत्वाच्या बातम्या 


Omprakash Rajenimbalkar Meets Manoj Jarange Patil : ओमराजे थेट अंतरवाली सराटीत, मनोज जरांगेंना म्हणाले, पाणी प्या, तामिळनाडूचा दाखला देत केंद्रावर हल्ला!