Nashik Teachers Constituency Election 2024 : लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीचे आता साऱ्यांना वेध लागले आहे. अशातच नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत दररोज नवा ट्विस्ट येत आहे. आज निवडणुकीतून माघारीचा शेवटचा दिवस आहे.  नुकताच महायुतीचे शिवसेना शिवसेना गटाचे उमेदवार विद्यमान खासदार किशोर दराडे (Kishor Darade) यांचे नाम साधर्म्य असणारे किशोर दराडे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. या पाठोपाठ शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार संदीप गोपाळराव गुळवे (Sandeep Gulve) यांचे नाम साधर्म्य असणारे संदीप नामदेव गुळवे यांनीदेखील आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.


असे असले तरी नाशिक शिक्षक मतदारसंघातील (Nashik Teachers Constituency Election 2024) अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे (Vivek Kolhe)यांच्याशी संबंधित असलेल्या अनेक संस्थांवर धाड टाकण्यात आली आहे. सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यात विविध पथकाच्या माध्यमातून ही चौकशी सुरू करण्यात आली आहे. संभाजीनगर, पुणे आणि सोलापूर येथील पथक चौकशी करत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.


गेल्या 14 तासांपासून कारखान्यातील विविध अधिकाऱ्यांची चौकशी


नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी अर्ज माघारीसाठी आज 12 जून दुपार पर्यंत मुदत आहे. असे असताना नाशिकमध्ये पार पडलेल्या हाय व्होल्टेज ड्रामानंतर आता अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांच्याशी संबंधित अनेक संस्थांवर धाडसत्र सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. मद्यनिर्मिती प्रकल्प तसेच इथोनोल प्रकल्प विभागातील कागदपत्रांची अधिकाऱ्यांकडून तपासणी केली जात असल्याची माहिती पुढे आली आहे. यात संजीवनी शिक्षण संस्थेची देखिल चौकशी केली जात आहे. गेल्या 14 तासांपासून कारखान्यातील विविध अधिकाऱ्यांची चौकशी होत असल्याची सूत्रांची माहिती आहे.


आज उमेदवारी अर्ज माघारीसाठी अखेरचा दिवस असल्याने ही कारवाई केली जात असून अपक्ष उमेदवारी मागे घेण्यासाठी दबाव तंत्राचा वापर होत असल्याची दबक्या आवाजात चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. या कारवाई मध्ये संभाजीनगर ,पुणे ,सोलापूर येथील पथक चौकशी करत असल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यामुळे आता विवेक कोल्हे यांच्याशी संबंधित अनेक संस्थांवर नेमकी काय कारवाई केली जाते याकडे सऱ्यांचे लक्ष लागले आहे.   


38 उमेदवारांनी 53 अर्ज दाखल


नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी 38 उमेदवारांनी 53 अर्ज दाखल केले होते. त्यापैकी 36 उमेदवारांचे अर्ज वैध आणि दोन उमेदवारांचे अर्ज अवैध ठरल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी दिलीय. अमोल दराडे आणि सारांश भावसार यांचे वय 30 वर्षापेक्षा कमी असल्याने त्यांचे अर्ज अवैध ठरवले आहेत. शिवसेना (शिदे गट) उमेदवार किशोर दराडे यांच्या शपथपत्राबाबत उमेदवार रणजित बोठे यांच्या प्रतिनिधींनी आक्षेप घेतला होता. त्यानंतर दराडे यांनी शपथपत्रात गुन्ह्यांबाबत पूर्ण माहिती दिलेली नसल्याने त्यांचा अर्ज अवैध ठरविण्याची मागणी केली होती. तो कायदेशीर तरतुदीनुसार फेटाळण्यात आला. परिणामी आज 3 वाजेपर्यंत अर्ज माघारीसाठीची मुदत आहे. त्यानंतर अंतिम चित्र समोर असणार आहे.


इतर महत्वाच्या बातम्या