Pankaja Munde on Manoj Jarange Patil, Beed : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) आज (दि.24) आंतरवाली सराटी येथे झालेल्या बैठकीत चागंलेच आक्रमक झालेले पाहायला मिळाले. मराठा समाजाने निवडणुकीच्या माध्यमातून राजकीय पक्षांना घेरण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, काल पंकजा मुंडे यांना काळे झेंडे दाखवणाऱ्या आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. आज मनोज जरांगे पाटील आक्रमक झालेले पाहताच मुंडे यांचा नरमाईचा सूर पाहायला मिळलाय. पंकजा मुंडे यांनी आंदोलकांवर गुन्हे दाखल करु नका, असे आवाहन पोलिसांना केले आहे.
काळे झेंडे दाखवणाऱ्या मुलावर गुन्हे दाखल करू नका : पंकजा मुंडे
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून पंकजा मुंडे यांचा ताफा जात असताना काही मुलांनी हातामध्ये काळी झेंडे धरून एक मराठा लाख मराठा अशा घोषणा दिल्या होत्या. त्यानंतर बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. मात्र अशा प्रकारचे गुन्हे दाखल करू नयेत, अशी मागणीच पंकजा मुंडे यांनी पोलिसांकडे केली आहे . पंकजा मुंडे यांनी पोलिसांना दिलेल्या पत्रामध्ये ती लहान मुले आहेत. केवळ झेंडे दाखवले म्हणून लहान मुलावरती गुन्हे दाखल करू नका अशी विनंती या पत्रातून केली आहे.
मनोज जरांगेंनी घेतलेल्या भूमिकेचे स्वागत
मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी आज (दि.24) मराठा समाज कोणत्याही राजकीय पक्षाला पाठिंबा देणार नाही, असा निर्णय घेतला. मात्र, प्रत्येक मतदारसंघात मराठा समाजाचा उमेदवार उभा करायचा आणि त्याला निवडून आणायचे, असा निर्णय मराठा बैठकीत घेण्यात आला. यावरही पंकजा मुंडे यांनी भाष्य केले आहे. पंकजा मुंडे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेचे स्वागत केले आहे.
जरांगे साधेपणातून उभे राहिले
अत्यंत साधेपणातून उभे राहिलेले आंदोलन आणि त्यातून मनोज जरांगे पाटील यांनी घेतलेली भूमिका ही स्वागतहार्य आहे. यापूर्वी सुद्धा मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मी कोणत्याही राजकीय पक्षासोबत उभा राहणार नाही, हे सांगितले होते. जरांगे पाटील यांनी ते पुन्हा सिद्ध केले. शेवटी निवडणुकीमध्ये त्यांनी अपक्ष उमेदवार देणे न देणे हा त्यांचा विषय आहे, असं पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले.
इतर महत्वाच्या बातम्या