जालना : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची (Maharashtra Assembly Elections 2024) आचारसंहिता लागण्यापूर्वी मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) प्रश्न सोडवा, अशी मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी केली होती. महाराष्ट्रात निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेत महायुतीचा सुपडा साफ करणार, असा इशारा दिला. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावरही जोरदार टीका केली. यानंतर महायुतीतील महत्त्वाचे नेते मनोज जरांगे यांची भेट घेण्यासाठी अंतरवाली सराटीत दाखल होत आहे. राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नुकतीच मनोज जरांगे यांची अंतरवाली सराटीत भेट घेतली. त्या पाठोपाठ आता भाजपचे माजी आमदार सुरेश धस यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतलीय.
सुरेश धस मध्यरात्रीनंतर अचानक मनोज जरांगेच्या भेटीला
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या अनेक महिन्यांपासून रस्त्यावर उतरलेले मनोज जरांगे यांनी राज्यात निवडणुका जाहीर होताच आपला संताप व्यक्त केला. आता या निवडणुकीमध्ये निर्णायक मतदान हे मराठ्यांचे आहे. आता रणशिंग फुंकले आहे. लढाईला उतरायचं म्हणजे तलवार काढावी लागेल. सरकारने मराठा आरक्षणाबाबत सरकारने आमची आशा संपवली असल्याचे त्यांनी म्हटले होते. दरम्यान, मनोज जरांगे यांची मनधरणीचे प्रयत्न महायुतीच्या नेत्याकडून केल्या जात असल्याची चर्चा आहे. अशातच भाजपचे माजी आमदार सुरेश धस यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतलीय.रात्री एक वाजता सुरेश धस हे अंतरवलीत दाखल झाले. यावेळी जवळपास अर्धा तास या दोघात बातचीत झाली. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर धस यांनी अचानक मनोज जरांगेंची भेट घेतल्याने या भेटित काय चर्चा झाली हे मात्र अद्याप समोर आले नाही. मात्र, या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
अजय महाराज बारस्करांच्या घरी दोन मद्यधुंद तरुणांचा राडा
अजय महाराज बारस्कर (Ajay Maharaj Barskar) हे मराठा आरक्षण आंदोलनाचे (Maratha Reservation) नेते मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या विरोधात भूमिका घेतल्यानं चर्चेत आले होते. मनोज जरांगे पाटील यांच्यावर त्यांनी यापूर्वी टीकेची झोड उठवली होती. अहिल्यानगरच्या बोल्हेगाव फाटा येथे अजय महाराज बारस्कर यांच्या घराच्या कंपाऊंडमध्ये दोन मद्यधुंद तरुणांनी धिंगाणा घातल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर अजय महाराज बारस्कर यांनी मद्यधुंद तरुण मनोज जरांगे यांचे समर्थक असल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे. पोलिसांनी बारस्कर यांच्या घरातून संबंधित तरुणांना ताब्यात घेतलं आहे.
हे ही वाचा