धाराशीव : विधानसभा निवडणुकीचं बिगूल वाजल्यानंतर राज्यात राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. राज्यातील प्रमुख पक्ष आपापल्या सक्षम उमेदवारांची घोषणा करत आहेत. दरम्यान, उमेदवार जाहीर करण्याच्या स्पर्धेत उद्धव ठाकरे यांचा पक्षदेखील मागे राहिलेला नाही. या पक्षाने धाराशीव मतदारसंघासाठीही आपला उमेदवार निश्चित केला आहे. शिवसेना पक्षफुटीवेळी एकनाथ शिंदेंची साथ सोडून मुंबईकडे परतणारे आमदार कैलास पाटील यांना धाराशीवची उमेदवारी जवळपास निश्चित झाली आहे. 


ठाकरेंचा धाराशीवचा उमेदवार ठरला


उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून नुकतेच वरूण सरदेसाई यांना वांद्रे पूर्व या मतदारसंघातून तिकीट दिले जाणार आहे. त्यानंतर आता ठाकरे यांच्या पक्षाने उस्मानाबाद या मतदारसंघासाठीदेखील आपला उमेदवार जवळपास निश्चित केला आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली शिवसेना पक्षात बंड झाले. याच बंडादरम्यान, शिंदे यांची साथ सोडून परत मुंबईला परतणारे कैलास पाटील यांना ठाकरे धाराशीव मतदारसंघासाठी तिकीट देणार आहेत. तसे संकेत आमदार उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. 


कैलास पाटील यांना कामाला लागण्याच्या सूचना


उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघासाठी कैलास पाटील यांचे तिकीट कन्फर्म झाले आहे. आदित्य ठाकरे यांच्याकडून कैलास पाटील यांना कामाला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत. मुंबईत कैलास पाटील आणि आदित्य ठाकरे यांच्यात बैठक झाली. या बैठकीत पाटील यांचे तिकीट कन्फर्म झाले आहे. 


एकनिष्ठ शिवसैनिक असी ओळख 


कैलास पाटील उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर गुजरातच्या रस्त्यावरून ते परत आले होते. एकनिष्ठ शिवसैनिक अशी त्यांची ओळख आहे. तिकीट कन्फर्म झाल्यानंतर कैलास पाटील मुंबईहून मतदारसंघाकडे रवाना झाले आहेत. 


तिकीट मिळाल्याचं कन्फर्म झाल्यानंतर कैलास पाटील यांच्या कार्यकर्त्यांकडून 'कैलास पर्व' असे सोशल मीडियावर कॅम्पेनिंग केले जात आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडून ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर कैलास पाटील आता जोमात प्रचारात उतरले आहेत. पाटील हे सलग दुसऱ्यांदा विधानसभेच्या रिंगणात उतरणार आहेत. त्यामुळे उस्मानाबाद या मतदारसंघातून कोण बाजी मारणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 


हेही वाचा :


Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापुरात अजूनही महाविकास आघाडीमध्ये घमासान सुरुच; या तीन जागांवर घोडं अडलं!


Bacchu Kadu : मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतली का? बच्चू कडू उत्तर देताना म्हणाले, '4 नोव्हेंबरला मोठा स्फोट होणार'


Bhandara News : शिवसेना शिंदे गटाचे आमदार नरेंद्र भोंडेकर मुख्यमंत्र्याची साथ सोडणार; अपक्ष निवडणूक लढण्याचीही तयारी