Manoj Jarange: राज्यात मागील काही दिवसांपासून मराठा आरक्षण आंदोलन मनोज जरांगे आणि बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांचं वाकयुद्ध सुरू आहे. मनोज जरंगे पाटील यांची बाजू घेतो का म्हणून बार्शी ते का तरुणाला आमदार राजेंद्र राऊत यांनी मारहाण केल्याचा आरोप मागील काही दिवसांपासून केला जातोय यावरूनच मराठा आंदोलन मनोज तरंगे आणि आमदार राजेंद्र राऊत यांच्यात आरोप प्रत्यारोपच्या फैरी झडत आहेत. आता पुन्हा एकदा अंतरवाली सराटीतून मनोज जरांगे यांनी आमदार राजेंद्र राऊतांवर टीका केली आहे. ते रक्त सांडेल म्हटले. मला थेटला तर मी सोडत नाही. मराठ्यांच्या शक्तीपुढे कोणाची दादागिरी चालणार नाही असा इशारा त्यांनी आमदार राजेंद्र राऊत यांना दिलाय.
राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला असून उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी आता घोंगडी बैठकीच्या माध्यमातून मराठा समाज बांधवांशी संवाद साधायला सुरुवात केली आहे. या दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी बार्शीतील आमदार राजेंद्र राऊत यांच्या भाषणाचा संदर्भ देत त्यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर, आमदार राऊत यांनीही जरांगेंना थेट आव्हान दिलं. त्यावरुन मनोज जरांगे आणि आमदार राऊत यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू असल्याचे दिसून येते.
काय म्हणाले मनोज जरांगे?
मनोज जरंगे म्हणाले, हे आम्हाला म्हणायचं याला शिव्या देतो त्याला शिव्या देतो. मी कोणाला शिव्या दिल्या? असल तुमची दादागिरी तिथे.. मराठा समाजावर दादागिरी करायचे नाही. तोडून टाकणार मारून टाकणार हे अगोदर कोण बोललं? मारायचा आणि तुकडे करायचा तुम्ही म्हणालात आम्ही नाही, असं जरांगे म्हणाले.
इथून पुढे सरकारी आंदोलन सुरू होणार
महाराष्ट्रातील मराठा आमदारांना फडणवीस यांच्या सांगण्यावरून मराठा समाजात फूट पाडायचे आहे. आमदार खासदार मंत्र्यांनी पहिल्यापासूनच गरिबांच्या पोरांचा वापर केला. इथून पुढे सरकारी आंदोलन सुरू होणार आहेत. त्यांची तयारी झाली आहे. असे जरंगे म्हणाले. मराठ्यांच्या आमदारांना तुला निधी देत नाही असं प्रेशर फडणवीसंचा आहे. माझ्या आंदोलनाच्या विरोधात जे बोलणार नाहीत त्याला आत टाकण्याची धमकी दिली जाते त्यामुळे बऱ्याच जणांना माझ्या विरोधात बोलायचं आहे. मी शेतकऱ्यांचा विषय घेतला मुळे त्यांची तडफड सुरू आहे. असे म्हणत त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसनसह आमदार राजेंद्र राऊतांवरही जोरदार टीका केली.
हेही वाचा:
Manoj Jarange: मनोज जरांगे पाटलांचा सोशल मिडिया रोहित पवारांकडून मॅनेज; आमदार राऊतांचा दावा