Manohar Joshi Passed Away : राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी (Manohar Joshi) यांचे निधन झाले आहेत. वयाच्या 87 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली आहे. मनोहर जोशी (Manohar Joshi Passed Away) यांना हृदयविकाराचा झटका आल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, मध्यरात्री 3 वाजता मुंबईच्या (Mumbai) हिंदुजा रुग्णालयात (Hinduja Hospital) उपचारा दरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर अनेक राजकीय प्रतिक्रिया देखील येत आहे. तसेच त्यांच्यासोबत काम करणाऱ्या अनेक राजकीय नेत्यांकडून मनोहर जोशी यांच्या आठवणींना उजाळा दिला जात आहे. 


महाराष्ट्राच्या राजकारणाचा सुसंस्कृत चेहरा हरवला : गडकरी 


महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि लोकसभेचे माजी अध्यक्ष ज्येष्ठ नेते मनोहर जोशी सरांच्या निधनाचे वृत्त ऐकून अतिशय दुःख झाले. सरांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणाचा सुसंस्कृत चेहरा हरवला. अतिशय नम्र, हजरजबाबी आणि महाराष्ट्र तसेच मराठी माणूस यांच्याविषयी मनापासून तळमळ असलेला नेता आपण गमावला आहे. युती सरकारच्या काळात जोशी सरांच्या नेतृत्वाखाली मला काम करण्याची संधी मिळाली. कुटुंब प्रमुखाप्रमाणेच कायम त्यांचे मार्गदर्शन लाभले. ईश्वर दिवंगत आत्म्यास शांती देवो आणि त्यांच्या कुटुंबीयांना या दु:खातून सावरण्याची शक्ती देवो. ॐ शांती.






संजय राऊतांची प्रतिक्रिया...


ब्राह्मण मुख्यमंत्री झाल्याने टीका झाली, पण बाळासाहेब ठाकरेंनी मनोहर जोशींच्या कर्तबगारीवर विश्वास होता. शून्यातून विश्व निर्माण करणारे.. कडवट महाराष्ट्र अभिमानी अखेरच्या श्वासा पर्यन्त शिवसैनिक म्हणुन जगलेले मनोहर जोशी यांना विनम्र अभिवादन! 






महाराष्ट्राचा 'कोहिनूर' हरपला: अंबादास दानवे 


दुःखद! महाराष्ट्राचा 'कोहिनूर' आज पहाटे हरपला. माजी मुख्यमंत्री, माजी लोकसभा सभापती मनोहर जोशी सरांचे पहाटे निधन झाले. शिवसेनेच्या पहिल्या फळीचे नेते म्हणून पक्ष उभा करण्यात त्यांनी दिलेले योगदान मोठे व अनमोल आहे. विशेष म्हणजे शिवसेनेचा झंझावात हा 'शिवसेना काल-आज-उद्या' या पुस्तक रुपात त्यांनी भावी पिढीसमोर मांडण्याचे मोठे कार्यही केले आहे. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो. 






जोशी कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी : मिलिंद नार्वेकर 


शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, लोकसभेचे माजी अध्यक्ष, माजी मुख्यमंत्री, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे सहकारी मनोहर जोशी सर यांच्या निधनाचे वृत्त दुःखद आहे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना. जोशी कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. भावपूर्ण श्रद्धांजली. 






इतर महत्वाच्या बातम्या : 


Manohar Joshi Passed Away: बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक हरपला; महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं निधन