मुंबई: राज्यात वाघांच्या संख्येत वाढ झाली असली तरी वाघांचे मृत्यू (Tiger Deaths) आणि शिकारी (Tiger Poaching) ही चिंतेचे बाब असल्याचे पुढे आले आहे. अशातच वाघांचे मृत्यू आणि शिकार रोखण्यासाठी प्रशासकीय स्तरांवर मोठ्या हालचाली केल्या जात आहे. राज्याचे वन मंत्री गणेश नाईक (Ganesh Naik) यांनी या संदर्भात कठोर निर्देश देत अवैध शिकाऱ्यांची माहिती मिळण्यासाठी खबऱ्यांची नेमणूक करा, अशा सूचना दिल्या आहेत. व्याघ्र संरक्षण दलातील पथकामार्फत अतिसंवेदनशील क्षेत्रात नियमित गस्त करा. शिवाय डॉग स्कॉड अंतर्गत सुध्दा गस्ती करून शिकारी हालचालीवर नियंत्रण ठेवा. अशा सूचना ही वन मंत्री गणेश नाईक यांनी दिल्या आहेत.
दरम्यान, अतिसंवेदनशील क्षेत्रात बिनतारी संदेश यंत्रणा कार्यान्वित करा. सायबर सेलच्या माध्यमातून शिकारीच्या घटनांमधील आरोपींचा शोध घ्या. तसेच अतिसंवेदशील क्षेत्रात नाक्यांवर तपासणी करून चौकशी करा. वाघाचे भ्रमणमार्ग, पाणवठे व महत्वाचे ठिकाणी कॅमेरा ट्रॅप लावून संशयास्पद हालचालींवर पाळत ठेवा, इत्यादी निर्देश ही वन मंत्री गणेश नाईक यांनी दिल्या आहेत.
इलेक्ट्रिक तारांमध्ये अडकून मोठ्याप्रमाणात वाघांचा मृत्यू
दरम्यान, नुकतेच वाघांच्या शिकारीसाठी कुख्यात असलेल्या बहेलिया टोळीचा मोरक्या अजित राजगोंड याला चंद्रपूरच्या राजुरा तालुक्यातून अटक करण्यात आल्याने वनविभागाच्या चिंतेत ही वाढ झाली असल्याचे बोलले जात आहे. कारण मध्यप्रदेशातील या बहेलिया टोळीने 2013 ते 2015 दरम्यान विदर्भात किमान 19 वाघांच्या शिकारी केल्याचा संशय वनविभाग आणि पोलिसांनी व्यक्त केला आहे.
तर सप्टेंबर 2024 मध्ये अजित हा जामिनावर जेलमधून बाहेर आला होता. मात्र अजित सारखा कुख्यात तस्कर अचानक राजुरा तालुक्यात सापडल्याने त्यासोबत आणखी काही शिकारी सक्रिय आहे का? याचा देखील तपास करण्यात येत आहे. अशातच वन मंत्र्यांनी दिलेल्या सुचनेनंतर शिकऱ्यांच्या मुसक्या आवळल्या जातात का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. दुसरीकडे इलेक्ट्रिक वायरमध्ये अडकून मोठ्याप्रमाणात वाघांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. त्या संदर्भात ही कठोर पाऊले उचलेल जाण्याची शक्यता आहे.
वाघांच्या संख्येत वाढ
- 2006 साली 103 वाघ
- 2010 मध्ये 169 वाघ,
- 2018 मध्ये 312 वाघ,
- 2022 मध्ये 444 पर्यंत पोहोचली आहे
अशातच, वाघांची जनगणना दर 4 वर्षांनी होते. त्यामुळे पुढच्या वर्षी किती वाघ वाढले यासंदर्भात माहिती मिळू शकणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या