Mahua Moitra on BJP, Delhi : "मी शेवटच्या वेळी लोकसभेत बोलण्यासाठी उभारले होते, तेव्हा माझा आवाज दाबण्यात आला. माझा आवाज दाबल्यामुळे सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला मोठी किंमत मोजावी लागली. मला खाली बसवण्याच्या नादात भाजपच्या 63 खासदारांना जनतेने कायमस्वरुपी खाली बसवले", असे तृणमुल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा म्हणाल्या. त्या लोकसभेत बोलत होत्या. यावेळी त्यांनी भारतीय जनता पक्षावर चौफेर टीका केली.
भारतीय जनता पक्ष 272 च्या मॅजिक फिगरपासून 33 जागांनी दूर आहे
महुआ मोईत्रा म्हणाल्या, मी जून 2019 मध्ये लोकसभेत एक भाषण केले होते. त्यावेळी मी फॅसिझमच्या 7 संकेतांवर भाष्य केलं होतं. सेंगोल हा अधिसत्तेचे प्रमाण असतो. भारतीय जनता पक्षाकडे 303 सदस्यांचे क्रूर बहुमत होते, ते आता राहिलेले नाही. आदरणीय राष्ट्रपतींनी भाषण केलं. भारतीय लोकांनी स्थिर सरकार निवडले. पण स्थिर सरकार नाही. भाजप अनेक पक्षांचा आधार घेऊन सत्तेत आलं आहे. भारतीय जनता पक्ष 272 च्या मॅजिक फिगरपासून 33 जागांनी दूर आहे, असंही मोईत्रा यांनी सांगितलं.
मोईत्रा मोदींना म्हणाल्या, घाबरु नका
खासदार महुआ मोईत्रा यांनी आपल्या भाषणाची सुरुवातीलाच पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत भाष्य केलं. पीएम मोदींना उद्देशून त्या म्हणाल्या, आदरणीय पंतप्रधान महोदय, मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही तासभर इथे आहात, माझेही ऐका... घाबरू नका, आज तुम्ही माझ्या भागात दोनदा आला आहात. तेव्हा ऐकत रहा सर...
इतर महत्वाच्या बातम्या