Mahesh Sawant on Samadhan Sarvankar: मुंबई महानगरपालिकेच्या वॉर्ड क्रमांक 194 मध्ये भाजपने मदत न केल्यामुळे माझा पराभव झाला, असा खळबळजनक आरोप शिंदे सेनेचे माजी नगरसेवक समाधान सरवणकर यांनी केला होता. त्यांच्या या वक्तव्याचा ठाकरे गटाचे आमदार महेश सावंत (Mahesh Sawant) यांनी समाचार घेतला. त्यांनी म्हटले की, पराभव झाल्यावर कोणावर तर खापर फोडावं लागते. समाधान सरवणकर (Samadhan Sarvankar) यांनी वैयक्तिक नावाने त्यांना किती मतदान होतंय याचा तपशील घ्यावा. भाजपने त्यांना मदत केली म्हणून त्यांना एवढे मत मिळाली आहेत. भाजपची मतं त्यांना मत मिळाली आहेत, याद्या बघा. पण सरवणकर हा माणूस असा आहे की, कितीही काम करा, त्याची परतफेड तो अशीच करतो, अशी बोचरी टीका महेश सावंत यांनी केली. (BMCC Election Results 2026)

Continues below advertisement

समाधान सरवणकर यांनी निवडणुकीच्यावेळी त्यांच्या वॉर्डात महिलांना साड्या वाटल्या, त्या साड्यांमधून मतदारांना पैसे देण्यात आले. तरीही जनतेने समाधान सरवणकर यांना मतं दिली नाहीत. आता समाधान सरवणकर जे आरोप करत आहेत, तो रडीचा डाव आहे. समाधान सरवणकर म्हणतात की, शीतल गंभीर यांच्या पराभवासाठी भाजपच्या स्थानिक टोळीने प्रयत्न केले, पण त्या थोड्या फरकाने निवडून आल्या. पण मुळात भाजप शीतल गंभीर यांच्या पराभवासाठी का प्रयत्न करेल? समाधान सरवणकर काहीही बोलतात, असे महेश सावंत यांनी म्हटले.

दरम्यान, समाधान सरवणकर यांच्या या आरोपांनंतर स्थानिक स्तरावर भाजप-शिवसेनेत वाद पेटला आहे. माहीममधील भाजप पदाधिकारी सरवणकर यांच्यारांविरोधात सायबर सेलमध्ये तक्रार करणार आहेत. दुपारी 12 वाजता भाजपचे पदाधिकारी वांद्रे येथील सायबर सेलमध्ये तक्रार दाखल करतील.  सरवणकर यांनी भाजपविरोधात खोटे आणि चुकीचे एसएमएस तयार करून सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा दावा भाजपकडून करण्यात आला आहे.

Continues below advertisement

Samadhan Sarvankar on BJP: भाजप असं करेल वाटलं नव्हतं, 'त्या' टोळीमुळे माझा पराभव: समाधान सरवणकर

पराभवापेक्षा मला माझ्या मतदारांनी चांगली साथ दिली. समोर उबाठा-मनसे युती होती, माझ्या भागात मराठी पट्टा असूनही मोठं मताधिक्य माझ्या पाठीशी उभं राहिल. फक्त 500 मतांनी माझा पराभव झाला. मतदानाच्या दिवशी उद्धव ठाकरे माझ्या वॉर्डमधील बुथवर गाडी घेऊन फिरत होते. त्याच्या एक दिवस आधी दोन्ही युवराजांच्या सभा झाल्या. पाच-पाच आमदार प्रत्येक ठिकाणी माझ्या इथे फिरत होते. एवढी त्यांची पॉवरफुल फोर्स असूनही मतदार न घाबरता माझ्या पाठीशी उभे राहिले. माझा 500 मतांनी पराभव झाला, ठीक आहे, निवडणुकीत असे होते. इथे जी काही वसुली टोळी आहे, ती टोळी प्रत्येक लोकसभेपासून ते विधानसभेपर्यंत मॅनेज होण्याचे काम करते. लोकसभेला तेच झाले, विधानसभेला मॅनेज झाले, महानगरपालिका निवडणुकीतही मॅनेज झाले. मात्र, यावेळेला त्यांनी फक्त आमचं नव्हे तर स्वत:चे उमेदवार पाडण्याचे काम केले.

भाजप पदाधिकाऱ्यांचा विशिष्ट ग्रूप, त्यांनी सर्वांना सांगितलं की यांना मदत करु नका. Whatsapp मेसेजवरुन सांगितले जात होते की, आपल्याला काहीतरी आलेलं आहे. त्यामुळे कोणी आम्हाला माहीममध्ये मदत केली नाही, असे समाधान सरवणकर यांनी म्हटले. WhatsApp चॅटमध्ये देखील लिहिण्यात आले होते की, आपल्याला यांचं (समाधान सरवणकर) काम करायचं नाही, आपल्याला यांचा पराभव करायचा आहे, असा दावा समाधान सरवणकर यांनी केला.

आणखी वाचा

भाजप असं करेल वाटलं नव्हतं, 'त्या' टोळीमुळे माझा पराभव; समाधान सरवणकरांचा गंभीर आरोप