Mahesh Kothe Profile in Marathi : सोलापूर जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे यांचं हृदयविकराच्या तीव्र धक्क्यानं आज निधन झालं आहे. पुढे आलेल्या माहितीनुसार कुंभमेळाच्या निमित्ताने प्रयागराज येथे गेले असता त्यांना हृदयविकाराचा धक्का आल्याची माहिती आहे. माजी महापौर महेश कोठे यांच्या निधनाच्या बातमीने सोलापूरसह राज्यात एकच खळबळ उडाली आहे. सोलापूर जिल्ह्यातील राजकीय वर्तुळातील महेश कोठे हे एक दिग्गज नेत्यांपैकी एक राहिले आहे. त्यांच्या या राजकीय प्रवासाची माहिती जाणून घेऊया.
कोण आहेत महेश कोठे?
महेश कोठे पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे नेते माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे निकटवर्तीय कै. विष्णुपंत कोठे यांचे सुपुत्र आहेत. मात्र 2014 च्या विधानसभे आधी महेश कोठे यांनी शिवसेनेत प्रवेश शिवसेनेकडून उमेदवारी मिळवत मध्य विधानसभा निवडणुकीत प्रणिती शिंदे यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. मात्र या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. 2017 च्या सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत कोठे यांच्यामुळे शिवसेनेला चांगले यश प्राप्त झाले. यात 22 नगरसेवक निवडून आल्याने प्रमुख विरोधी पक्ष म्हणून शिवसेना सोलापूर पालिकेत यापैकी 7 नगरसेवक हे कोठे यांच्या परिवाराशी निगडित होते. यात मुलगा, पुतण्या, बहीण हे त्यात आहेत. यावेळी महेश कोठे यांची निवड विरोधीपक्ष नेते पदी करण्यात आली होती.
दरम्यान 2019 च्या विधानसभा निवडणुकीत महेश कोठे यांचं शिवसेनेने तिकीट कापलं. त्यामुळे पक्षासोबत बंडखोरी करत महेश कोठे यांनी अपक्ष निवडणूक लढवली, मात्र त्यात ते अपयशी झाले. आमदार होण्यासाठी इच्छा पूर्ण न झाल्याने आता कोठे राष्ट्रवादीत प्रवेश करू पाहात होते. अशातच महेश कोठे यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करत नुकतीच त्यांनी विधानसभा निवडणूक सोलापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून लढवली होती. मात्र त्यात महायुतीच्या विजयकुमार देशमुख यांनी त्यांचा पराभव केला होता.
सोलापूरचे सर्वात तरुण महापौर
दरम्यान, सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे यांचं वयाच्या 55 वर्षी निधन झाल्यानं सोलापूरमध्ये हळहळ व्यक्त केली जातेय. महेश कोठे यांनी यंदाच्या विधानसभेत सोलापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. मात्र, यात त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. महेश कोठे यांचे सोलापूर शहराच्या राजकारणात मोठे प्रबल्य होते. सोलापूर महापालिकेचे महापौर, विरोधी पक्ष नेते, सभागृह नेते अशा विविध जबाबदारी त्यांनी पार पडल्या आहेत. तर काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी शरद पवार गट अशा विविध पक्षात महेश कोठे यांचा प्रवास राहिला आहे.
हे ही वाचा