Mahayuti Seat Sharing : मुंबई : महायुतीच्या जागा वाटपाचा (Mahayuti Seat Sharing) तिढा आता दिल्लीतच (Delhi) सुटणार आहे. महायुतीच्या काही जागांवर पेच कायम असल्यानं हा पेच आता दिल्लीतच सुटणार अशी चिन्ह दिसत आहेत. लवकरच महायुतीतील भाजप (BJP), शिवसेना (Shiv Sena) शिंदे गट (Shinde Group), राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) अजित पवार गट (Ajit Pawar Group) अशा तिन्ही पक्षातील प्रमुख नेत्यांची दिल्लीत आणखी एक बैठक पार पडणार आहे. भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्यासोबत तिन्ही पक्षांच्या नेत्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत जागावाटपाचा तिढा सोडवण्याचा प्रयत्न तिन्ही पक्षांच्या नेत्यांचा असणार आहे.
महायुतीमधील तिन्ही पक्षांमध्ये लोकसभेच्या बहुतांश जागांवर एकमत झाले असले तरी काही जागांवरुन रस्सीखेच सुरु आहे. आता यावर तोडगा दिल्लीतच निघणार आहे. आता दिल्लीत महायुतीची बैठक होण्याची शक्यता आहे. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy CM Ajit Pawar) यांच्यासह भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे नेते दिल्लीला जाणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत महायुतीच्या नेत्यांची बैठक पार पडणार असून याच बैठकीत महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सोडवला जाईल, अशी माहिती मिळत आहे.
कोणत्या जागांचा तिढा अजूनही कायम?
- दक्षिण मुंबई
- उत्तर पश्चिम मुंबई
- उत्तर मध्य मुंबई
- रत्नागिरी -सिंधुदुर्ग
- ठाणे
- धाराशिव
- गडचिरोली
- भंडारा - गोंदिया
- अमरावती
- परभणी
- सातारा
- नाशिक
मनसेच्या येण्यानं महायुतीचं समीकरण बदलणार?
लोकसभेचं बिगुल वाजलं पहिल्या टप्प्यासाठी आचारसंहिताही जाहीर झाली. मात्र, असं असलं तरीदेखील अद्याप महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील जागावाटपाचा तिढा काही सुटण्याचं नाव घेत नाही. अशातच दोन दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी दिल्लीत अमित शाह यांची भेट घेतली. सध्या मनसे महायुतीत दाखल होणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. या भेटीत अमित शहांनी राज ठाकरेंचा दोन जागां प्रस्ताव फेटाळून एक जागा देणं शक्य असल्याचं आश्वासन दिलं. आता महायुतीसोबत जायचं की नाही? याचा संपूर्ण निर्णय राज ठाकरेंवर सोडण्यात आला आहे. जर राज ठाकरेंनी महायुतीसोबत जाण्याचं ठरवलं, तर शिंदेंना त्यांच्या वाट्याची एक जागा गमवावी लागणार असल्याचं बोललं जात आहे. जर मनसे महायुतीसोबत आली, तर दक्षिण मुंबईची जागा मनसेला देण्याचा भाजपचा मनसुबा असल्याचं बोललं जात आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
EXCLUSIVE: "एकच जागा देणं शक्य"; राज ठाकरेंचा लोकसभेसाठी दोन जागांचा प्रस्ताव, अमित शाहांनी फेटाळला