Raj Thackeray and Amit Shah Meeting : नवी दिल्ली : गेल्या दोन दिवसांपासून संपूर्ण राज्यासह (Maharashtra Politcs) देशाचं लक्ष दिल्लीतील घडामोडींकडे लागलं आहे. आगामी लोकसभा निवडणुकांच्या (Lok Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर दिल्लीत अनेक घडामोडी घडत आहेत. अशातच आधीपासूनच राजकीय भूकंपांनी बेजार झालेल्या महाराष्ट्रात आणखी एक राजकीय भूकंप पाहायला मिळणार असं चित्र दिसतंय. मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) भाजप हायकमांडच्या भेटीसाठी दिल्लीला गेले होते. तेव्हापासूनच आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप (BJP), शिंदे (Shiv Sena Shinde Group) आणि पवार (NCP Ajit Pawar Group) यांच्या महायुतीत (Mahayuti) आता मनसेही सामील होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. अशातच राज ठाकरे आणि अमित शाहांच्या (Amit Shah) बैठकीत नेमकं काय घडलं? याची EXCLUSIVE माहिती एबीपी माझाकडे आली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दोन जागा दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबई मनसेला देण्यात यावी असा प्रस्ताव भाजपसमोर ठेवला होता. राज ठाकरेंचा हा प्रस्ताव अमित शहांनी मात्र फेटाळला आहे. केवळ एक जागा देणं निश्चित, पण दुसरी जागा देणं कठीण असल्याचं अमित शाहांनी राज ठाकरेंना सांगितलं. तसेच, राज ठाकरेंनी लोकसभेनंतर कसं पुढे जायचं? या बद्दलही विचारणा केली. त्यावर, या घडीला कुठलीही कमिटमेंट देणं शक्य नाही, असंही अमित शाह राज ठाकरेंना म्हणाल्याची माहिती मिळत आहे.
विधानसभा देखील एकत्र लढवू पण तेव्हाचं जागावाटप तेव्हा ठरवू : अमित शाह
विधानसभा देखील एकत्र लढवू पण तेव्हाचं जागावाटप तेव्हा ठरवू असंही अमित शाह म्हणाले. महत्त्वाचं म्हणजे, याआधी उद्धव ठाकरे यांच्यासोबत जे झालं त्याची पुनरावृत्ती व्हायला नको आणि म्हणूनच आता फक्त लोकसभा निवडणुकांसंदर्भात बोलू, विधानसभेचं विधानसभेला ठरवू अशी स्पष्ट भूमिका भाजप नेते अमित शाहांनी राज ठाकरेंसमोर मांडल्याची माहिती मिळत आहे.
नेमकं काय झालं?
राज ठाकरे दिल्लीत अमित शहांना भेटले त्यापूर्वी त्यांची देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक झाली होती. फडणवीसांसोबतच्या बैठकीत जवळपास निश्चित झालं होतं की, आता नेमकं कसं पुढे जायचं आहे. हे सर्व ठरल्यानंतरच राज ठाकरे दिल्लीला गेले. तिथे अमित शहांसोबत युतीबाबत आणि आगामी लोकसभा निवडणुकांबाबत चर्चा झाली. सुरुवातीला मनसेनं तीन जागांचा प्रस्ताव ठेवल्याची माहिती एबीपी माझाच्या सूत्रांनी दिली आहे. मुंबईतील बैठकीतच राज ठाकरेंना तीन जागांसाठी स्पष्ट नकार देण्यात आला होता. त्यानंतर अमित शहांसोबतच्या बैठकीतही राज ठाकरेंचा हा प्रस्ताव फेटाळण्यात आला. तर एक जागा देणं शक्य असल्याचं अमित शहांनी सांगितलं.
पाहा व्हिडीओ : MNS-BJP Alliance : मुंबईतील दोन जागा मनसेला देण्याचा राज ठाकरेंचा अमित शाहांसमोर प्रस्ताव