Unmesh Patil on Girish Mahajan, Jalgaon : नुकतेच भारतीय जनता पक्षातून ठाकरे गटात प्रवेश केलेल्या उन्मेश पाटील यांनी मंत्री गिरीश महाजनांवर आरोपांची मालिकाच सुरु केली आहे. शेतकऱ्यांना लुटणाऱ्या लुटारू गँगचे प्रमुख गिरीश महाजन आहेत. जिल्हा बँकेत फसवणूक करणारे नेते हे मंत्री गिरीश महाजन यांनी तोडाफोडीचे राजकारण करून बसवलेले नेते आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या लुबाडणूक करण्याला जसे हे नेते जबाबदार आहेत. तशाच पद्धतीने त्यांना त्या पदावर बसवणारे मंत्री गिरीश महाजन (GirishMahajan) देखील या गँगचे प्रमुख आहेत, असा खळबळजनक आरोप उन्मेष पाटील (UnmeshPatil) यांनी केला आहे. जळगावमध्ये उन्मेष पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.
शिवसेनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आंदोलन करणार
निवडणुकीच्या काळात शेतकऱ्यांचा समस्याकडे यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. आता निवडणूक संपली असल्याने तातडीने यांनी शेतकऱ्यांच्या साठी पीक विमा मिळण्यासाठी,कर्ज मिळण्या साठी,भाव मिळण्यासाठी काम केले पाहिजे. नाही तर शेतकऱ्याचा उद्रेक यांना पाहायला मिळेल. आम्ही सुद्धा शिवसेनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आंदोलन करणार असल्याचं उन्मेष पाटील (UnmeshPatil) यांनी म्हटलं आहे.
लोकशाहीचा खून करण्याचे काम तुम्ही करत आहात
राजकारण राजकारणाच्या ठिकाणी ठेवा. तुम्ही थोडे संवेदनशील व्हा. तुमच्या अंगी झुंडशाहू कुठून आली? तुमच्यामध्ये एवढी गुरमी कुठून येते? तुम्हाला एवढं कोणी निगरगट्ट कोणी केलं? लोकशाहीचा खून करण्याचे काम तुम्ही करत आहात, असंही उन्मेष पाटील (Unmesh Patil) म्हणाले.
संकटमोचक नाही, तर संकट आहे
गिरीश महाजन यांना दोन नंबरच्या पैशाची मस्ती, संकटमोचक नाही, तर संकट आहे. हे दिल्लीच्या गोष्टी करतात, गल्लीच्या गोष्टींबाबत. जामनेरचे मंत्री हे मुख्यमंत्र्यांच्या जवळचे असले तरी त्यांनी दोन नंबरचे पैसे कमावले आहेत. त्यांना दोन नंबरच्या पैशाची यांची मस्ती आहे, असं काही दिवसांपूर्वी उन्मेश पाटील (Unmesh Patil) यांनी म्हटलं होतं.
इतर महत्वाच्या बातम्या
