Dharashiv Vidhansabha Election : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Vidhansabha Election) महायुती किंवा महाविकास आघाडीमधील (Mahavikas Aaghadi) जागावाटपाचा पेच सुटलेले नाही. दोन्ही आघाड्यांमध्ये जाग वाटपावरुन पेच कायम आहे. भाजपने पहिली उमेदवारी जाहीर केल्यानंतर अनेक बंडखोरांनी तोंड वर काढले आहे. त्यामुळे उमेदवारी जाहीर झालेल्या नेत्यांनी तसेच महायुतीतील घटक पक्षांच्या नेत्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर गर्दी केली होती. दरम्यान, उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघही याला अपवाद राहिलेला नाही. उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीकडून इच्छुकांची मोठी गर्दी झाली आहे. 


उस्मानाबाद विधानसभेची जागा महायुतीत कोणाला मिळणार ? 


उस्मानाबाद विधानसभेच्या जागेवरून महायुतीत पेच कायम आहे. उस्मानाबाद विधानसभेची जागा महायुतीत कोणाला मिळणार ? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. महायुतीतील तिन्ही पक्षाचे नेते मुंबईत तळ ठोकून आहेत. उस्मानाबादच्या जागेवरुन भाजप नेते राणा जगजितसिंह पाटील आणि शिंदेंच्या शिवसेनेचे नेते तानाजी सावंत यांच्यामध्ये वर्चस्वाची लढाई सुरु आहे. दोन्ही नेत्यांनी आपल्या समर्थकांला उमेदवारी मिळवण्यासाठी लॉबिंग सुरु केले आहे. 


उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघात महायुतीतील तिन्ही पक्षाकडून इच्छुकांची गर्दी 


उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघात तिन्ही पक्षाकडून इच्छुकांची गर्दी पाहायला मिळत आहे. भाजपकडून नितीन काळे, अजित पिंगळे, सरोजिनी राऊत इच्छुक आहेत. तर शिंदे गटाकडून नितीन लांडगे, सुधीर पाटील, शिवाजी कापसे,  सुरज सोळंके, तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत इच्छुक आहेत. या शिवाय अजित पवार गटाकडूनही 2019 विधानसभा निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकाचे उमेदवार म्हणून जागेवर दावा करण्यात येतोय. 


कैलास पाटील यांची उमेदवारी जवळपास निश्चित 


अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून शिक्षक आमदार विक्रम काळे उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. विक्रम काळेंनी कार्यकर्त्यांच्या भेटीगाठीलाही सुरुवात केली आहे. याशिवाय मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचा पाठिंबा मिळाला तर राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत विधानसभेच्या आखाड्यात उतरण्याची डॉ. प्रतापसिंह पाटील यांची तयारी आहे. त्यामुळे महायुतीत उस्मानाबाद विधानसभेसाठी तोबा गर्दी पाहायला मिळत आहे. दरम्यान, महायुतीमध्ये इच्छुकांमध्ये गर्दी असली तरी महाविकास आघाडीमध्ये असा पेच राहिलेला नाही. महाविकास आघाडीकडून ठाकरेंचे आमदार कैलास पाटील यांना पुन्हा एकदा उमेदवारी मिळणे जवळपास निश्चित मानले जात आहे.  महाविकास आघाडीकडून शिवसेनेच्या कैलास पाटील यांना आदित्य ठाकरेंकडून ग्रीन सिग्नल मिळाला आहे. शिवाय त्यांना कामाला लागण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. 


इतर महत्त्वाच्या बातम्या 


मुंडेच वरचढ, जिल्ह्यातील राजकीय घराणेशाहीचा बीड पॅटर्न; 2024 च्या निवडणुकीतही नातीगोतीच