Raksha Khadse : शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आमदार चंद्रकांत पाटील (MLA Chandrakant Patil) यांच्याशी घरगुती वाद असले तरी तो विषय बाजूला ठेवून,आपण त्यांचा महायुतीचे उमेदवार म्हणून प्रचार करणार असल्याची प्रतिक्रिया मंत्री रक्षा खडसे (Raksha Khadse) यांनी दिली आहे. माझ्याशी चर्चा करण्याअगोदरच आमदार चंद्रकांत पाटील हे मी त्यांचा प्रचार करणार नसल्याचे म्हणत आहेत. मात्र, मी भाजपची कार्यकर्ता आहे. त्यामुळं महायुती म्हणून मी त्यांचा प्रचार करणार असल्याचे खडसे म्हणाल्या. या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून रोहिणी खडसे निवडूक लढवत आहेत.
पक्षाने दिलेला आदेश मी नक्कीच पाळेल
मुक्ताईनगरमध्ये भाजपचे कार्यकर्ते हेच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत. त्यामुळे आपल्या प्रचाराबाबत मुक्ताईनगरचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी रक्षा खडसेंवर शंका उपस्थित केली होती. त्यावर रक्षा खडसेंनी ही प्रतिक्रिया दिली आहे. महायुतीचे उमेदवार जिथे आहेत त्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठीच भाजप पूर्ण ताकद लावेल असे त्या म्हणाल्या.
मुक्ताईनगरमध्ये ननंद भावजईचा समिकरण नवे नाही
बंडखोरी रोखण्यासाठी गिरीश महाजन यांच्याकडूनही प्रयत्न सुरु आहेत. महायुतीत होत असलेल्या बंडखोरी बाबत केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसेंची प्रतिक्रिया दिली. मुक्ताईनगर मध्ये ननंद भावजईचा समिकरण नवे नाही. लोकसभेत रोहिणी खडसे यांनी माझ्या विरोधात प्रचार केला होता. विधानसभा निवडणुकीत मी माझ्या पक्षाचं काम करेल रोहिणी खडसे आपल्या पक्षाचे काम करतील असेही रक्षा खडसे म्हणाल्या.
महायुतीचे जेवढे आमचे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी प्रयत्न करायचे आहेत व त्यांना निवडून आणायचा आहे असे खडसे म्हणाल्या.
नाथाभाऊंनी कुठल्या पक्षात जावं हा त्यांचा व्यक्तिगत निर्णय
एकनाथ खडसे यांच्याबाबत देखील प्रसारमाध्यमांनी त्यांना प्रश्न विचारले. यावेळी त्या म्हणाल्या की, नाथाभाऊंनी कुठल्या पक्षात जावं हा त्यांचा व्यक्तिगत निर्णय आहे. मी माझ्याबद्दल बोलू शकते. मात्र नाथाभाऊंच्या निर्णयाबाबत नाथाभाऊ सांगू शकतात असे रक्षा खडसे म्हणाल्या.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या तुतारी चिन्हावरून रोहिणी खडसे प्रचंड मतांनी विजयी होतील, असा विश्वास मुलीच्या विजयाबाबत माजी मंत्री आणि आमदार एकनाथ खडसे यांनी व्यक्त केला. मुक्ताईनगर हा एकनाथ खडसे यांच बालेकिल्ला मानला जातो. मात्र, 2019 च्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात रोहिणी खडसेंचा पराभव झाला होता. आता यावेळी पुन्हा रोहिणी खडसे या मैदानात उतरल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या: