Rashmi Bagal Met Devendra Fadnavis : विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election) पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलच तापल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अनेक मतदारसंघात इच्छुकांची मोठी गर्दी असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अशातच करमाळा मतदारसंघात ( Karmala Assembly) देखील इच्छुकांची संख्या मोठी आहे. महायुतीकडून हा मतदारसंघ भाजपला सुटावा अशी मागणी रश्मी बागल (Rashmi Bagal) यांनी केली आहे. रश्मी बागल या देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या भेटीसाठी सागर निवासस्थानी दाखल झाल्या आहेत.
करमाळ्यामधून भाजपकडून रश्मी बागल यांचे नाव चर्चेत
करमाळा विधानसभा मतदारसंघ भाजपला सोडण्यात यावी अशी मागणी रश्मी बागल यांनी केली आहे. करमाळ्यामधून भाजपकडून रश्मी बागल यांचे नाव चर्चेत आहे. मात्र, त्या बाहेरील असल्याचं म्हणत बागल यांच्या नावाला स्थानिक शिवसेनेचा विरोध होत असल्याचं पाहायला मिळत आहे. याप्रकरणी दोन दिवसाआधी करमाळ्यातील शिवसैनिकांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत बागल यांना उमेदवारी देण्यात येऊ नये अशी मागणी केली होती. रश्मी बागल यांनी करमाळा मतदारसंघातून 2019 साली शिवसेनेकडून निवडणूक लढवली होती. मात्र, यावेळी त्यांचा परभाव झाला होता. अपक्ष उमेदवार संजयमामा शिंदे विजयी झाले होते. या निवडणुकीनंतर रश्मी बागल यांनी शिवसेनेतून भाजपमध्ये प्रवेश केला होता.
करमाळ्यात तिरंगी लढत होण्याची शक्यता
सोलापूर जिल्ह्यातील करमाळा विधानसभेसाठी शरद पवार (Sharad Pawar) गटाकडून माजी आमदार नारायण पाटील (Narayan Patil) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी (Lok Sabha Election 2024) शिवसेना शिंदे गटातून (Shiv Sena Shinde Group) नारायण पाटील यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. करमाळा तालुक्यातून मोहिते पाटील यांना मोठा लीड मिळवून देणाऱ्या नारायण पाटील यांना आता तिकिटाचं बक्षीस मिळालं आहे. त्यामुळं यावेळी देखील करमाळा विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे रश्मी बागल देखील निवडमुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. दुसरीकडे संजयमामा शिंदे हे अपक्ष असले तरी त्यांनी अजित पवार गटाला पाठिंबा दिला होता. मात्र, यावेळी देखील त्यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं ही जागा महायुतीकडून भाजपला सुटावी अशी मागणी जोर धरत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
महत्वाच्या बातम्या:
करमाळा विधानसभेसाठी शरद पवारांचा उमेदवार ठरला; जयंत पाटलांकडून नाव जाहीर, संजयमामांसमोर कोणाचं आव्हान?