Maval Vidhansabha Election News : विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election) पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अनेक ठिकाणी जागावाटपाच्या मुद्यावरुन महायुतीत नाराजी पाहायला मिळत आहे. मावळ मतदारसंघात (Maval Vidhansabha Election) देखील महायुतीत बंडखोरी झाली आहे. अजित पवार गटाच्या सुनिल शेळकेंना (Sunil Shelke) पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळं भाजपचे नेते बाळा भेगडे (Bala Bhegade) नाराज आहेत. त्यांनी अपक्ष उमेदवार बापू भगडेंना (Bapu Bhegade) पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाळा भेगडेंची नाराजी शमवण्यासाठी भेट घेतली.  मात्र, फडणवीसांच्या भेटीनंतरही बाळा भेगडे हे बंडखोराचा प्रचार करणार असल्याची माहिती खात्रीपूर्व सूत्रांची दिली आहे. 


बाळा भेगडे बंडखोर बापू भेगडेंचा प्रचार करण्यावर ठाम 


महायुतीचे मावळचे उमेदवार सुनील शेळके आणि भाजपच्या बाळा भेगडे यांच्यातील नाराजी मिटवण्यासाठी   फडणवीसांनी भेगडेंची भेट घेतली. मात्र बाळा भेगडे यांचं यातून काही समाधान झालं नसल्याचं बोललं जात आहे. त्यामुळं ते बंडखोर बापू भेगडेंचा प्रचार करण्यावर ठाम आहेत, अशी माहिती खात्रीपूर्वक सूत्रांनी दिली आहे. उद्या बापू भेगडेंचे अर्ज दाखल करण्यासाठी बाळा भेगडे स्वतः हजर राहतील. फडणवीसांच्या भेटीनंतरची पुढची भूमिका बाळा भेगडे सायंकाळी पत्रकार परिषदेत जाहीर करतील. यात आपण माघार घेत नसल्याचं ते पुन्हा एकदा स्पष्ट करतील, अशी माहिती मिळाली आहे. 


शरद पवार गटाचा बापू भेगडेंना पाठिंबा


राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवारांनी उमेदवारी दिलेल्या सुनील शेळकेंना घेरण्यासाठी शरद पवारांनी अखेर नवा डाव टाकला आहे. मावळमध्ये तुतारीचा उमेदवार न देता, अजित पवार गटातून बंडखोरी केलेल्या बापू भेगडेंना शरद पवार गटाने ही पाठिंबा जाहीर केला आहे. एबीपी माझाने दोन दिवसांपूर्वी दिलेल्या या बातमीवर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. महायुतीकडून शेळकेंना उमेदवारी जाहीर झाली आहे, त्याच दिवशी भाजपने बंडखोर बापू भेगडेंना जाहीर पाठिंबा दर्शवला. त्यानंतर भेगडेंनी शरद पवारांकडे पाठिंबा देण्याची मागणी केली होती, शेळकेंना कोंडीत अडकवण्यासाठी पवारांनी सुद्धा हा नवा खेळला. सोमवारी शरद पवार गट बापू भेगडेंचा अर्ज दाखल करताना हजर राहणार आहे. स्थानिक शरद पवार गटाकडून ते जाहीर करण्यात आलं आहे.


महत्वाच्या बातम्या:


Sharad Pawar: मावळमध्ये शरद पवार गटाचा बंडखोर भेगडेंना पाठिंबा, बंडखोरासाठी मावळ पॅटर्न राबवणार? एबीपी माझाच्या बातमीवर शिक्कामोर्तब