Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) भाजपने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करत बाजी मारली आहे. महायुतीतील (Mahayuti)  मोठा पक्ष आलेल्या भाजपने बाजी मारताना (BJP First Candidate List for Maharashtra Assembly Election 2024) पहिल्या यादीत 99 उमेदवार जाहीर केले आहेत. पहिल्या यादीमध्ये भाजपकडून विद्यमान आमदारांना संधी देण्यात आली आहे. त्याचबरोबर 13 महिला सुद्धा उमेदवारीच्या रिंगणामध्ये आहेत.


असे असताना राष्ट्रवादी अजित पवार (Ajit Pawar)  गटातून एक मोठी बातमी समोर आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज आपल्या राष्ट्रवादी पक्षाच्या उमेदवारांची पहिली यादी (Ajit Pawar NCP First Candidate List for Maharashtra Assembly Election 2024) आज संध्याकाळ पर्यंत जाहीर  करणार असल्याची शक्यता आहे. हाती आलेल्या माहितीनुसार पहिल्या यादीत 32- 35 नाव असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर यादी जाहीर करण्यापूर्वीच अजित पवार उमेदवारी निश्चित असलेल्या आमदारांना एबी फॅार्मचे वाटप करत असल्याची माहितीही पुढे आली आहे.


शिंदे यांच्या उमेदवारांची यादी सुद्धा आजच येण्याची शक्यता


दुसरीकडे मुख्यमंत्री शिंदे यांच्या उमेदवारांची यादी सुद्धा आजच येण्याची शक्यता आहे. पहिल्या यादीमध्ये 50 उमेदवार असतील असे बोलले जात आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेना फोडून बंडाळी केल्यानंतर त्यावेळी साथ दिलेल्या सर्वच आमदारांना पहिल्या यादीमध्ये स्थान दिलं जाईल असं बोललं जात आहे. अजित पवार यांच्याकडूनही यादी लवकरात लवकर जाहीर केली जाईल असं बोललं जात आहे. दरम्यान, भाजपकडून जाहीर करण्यात आलेल्या उमेदवारांमध्ये मराठवाडामध्ये 16 विधानसभा मतदारसंघांमध्ये उमेदवार देण्यात आले आहेत. मात्र यामध्ये आता भोकर या मतदारसंघाची वाढ झाल्याने एकूण 17 ठिकाणी भाजप उमेदवार असतील. यामध्ये बीड जिल्ह्यातील गेवराई येथून उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. मागीलवेळी येथून लक्ष्मण पवार यांना उमेदवारी देण्यात आली होती. छत्रपती संभाजी नगरमधून फुलंब्री विधानसभा मतदारसंघातून माजी आमदार हरिभाऊ बागडे यांची राजस्थानच्या राज्यपाल पदी नियुक्ती झाल्याने त्या ठिकाणी भाजपकडून अनुराधा चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली आहे. 


अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 41 संभाव्य उमेदवार


1.अजितदादा पवार - बारामती 
2. छगन भुजबळ - येवला 
3. हसन मुश्रीफ-कागल
4. धनंजय मुंडे - परळी 
5. नरहरी झिरवाळ - दिंडोरी 
6. अनिल पाटील - अमळनेर 
7.राजू कारेमोरे - तुमसर 
8. मनोहर चंद्रीकापुरे - अर्जुनी मोरगाव 
9. धर्मरावबाबा आत्राम - अहेरी 
10.इंद्रनील नाईक - पुसद
11. चंद्रकांत नवघरे - वसमत 
12. नितीन पवार - कळवण 
13. माणिकराव कोकाटे - सिन्नर 
14. दिलीप बनकर - निफाड 
15. सरोज अहिरे - देवळाली 
16. दौलत दरोडा - शहापूर 
17. अदिती तटकरे - श्रीवर्धन 
18. संजय बनसोडे - उदगीर
19. अतुल बेनके - जुन्नर 
20. दिलीप वळसे पाटील - आंबेगाव 
21. दिलीप मोहिते - खेड - आळंदी 
22. दत्तात्रय भरणे - इंदापूर 
23. यशवंत माने - मोहोळ 
24. सुनिल शेळके  - मावळ 
25. मकरंद पाटील - वाई
26. शेखर निकम  - चिपळूण 
27. अण्णा बनसोडे  - पिंपरी 
28. सुनिल टिंगरे - वडगाव शेरी 
29. राजेश पाटील - चंदगड 
30. चेतन तुपे - हडपसर 
31. किरण लहामटे - अकोले
32. संजय शिंदे - करमाळा 
33. देवेंद्र भुयार - मोर्शी 
34. आशुतोष काळे - कोपरगाव 
35 संग्राम जगताप - अहमदनगर शहर 
36. जयसिंह सोळंके - माजलगाव 
37. बाबासाहेब पाटील - अहमदपूर 
38. सना मलिक - अणुशक्तीनगर 
39. नवाब मलिक - शिवाजीनगर मानखुर्द 
40. अमरावती शहर - सुलभा खोडके 
41.इगतपुरी - हिरामण खोसकर


इतर महत्वाच्या बातम्या