मुंबई : राज्यात विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि महायुतीने कंबर कसली असून आपापले उमेदवार निवडून आणण्यासाठी राजकीय गणित मांडलं जात आहे. त्यामध्ये हितेंद्र ठाकुर (Hitendra Thakur) यांच्या बहुजन विकास आघाडीची तीन मतं निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. ही तीन मतं नेमकी कोणाच्या पारड्यात पडणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. जो आमची कामं करेल त्याला मत देऊ, आणि ज्याला मत देऊ तो उमेदवार निवडून येईल अशा विश्वास हितेंद्र ठाकुर यांनी व्यक्त केला आहे.
हितेंद्र ठाकूर यांच्याकडे असलेल्या मतांवर दोन्ही बाजूंचा डोळा आहे. त्यासाठी महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांच्या त्यांच्याशी भेटीगाठी सुरू असल्याचं दिसतंय.
हितेंद्र ठाकुर म्हणाले की, माझे सगळ्या पक्षांसोबत चांगले संबंध आहेत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री ही माझी कामं करतात, त्यासाठी मी त्यांना भेटतो. तुम्ही फक्त चार-पाच नाव घेऊ नका, मी सर्व नेत्यांशी भेटतो आणि माझे चांगले संबंध आहेत.
आमची तीन मतं जर गेमचेंजर ठरत असतील तर पुढच्या वेळेस मी अधिक उमेदवार निवडून आणेन असं हितेंद्र ठाकुर म्हणाले. ते म्हणाले की, "मिलिंद नार्वेकर माझे चांगले मित्र आहेत. शेकापचे जयंत पाटीलसुद्धा चांगले मित्र आहेत. आम्ही तीन मतं कुणाला द्यायची याचा निर्णय घेऊ. जो आमची कामं करेल त्याला मत देऊ, आणि ज्याला मत देऊ तो उमेदवार निवडून येईल."
जिंकण्यासाठी 23 मतांचा कोटा
विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी 23 मतांचा कोटा असेल. विधानसभेत महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये कोणाची किती ताकद असेल आणि अकरावी जागा निवडून आणण्यासाठी मतांची जुळवाजुळव कशी करावी लागणार याची आकडेवारी जाणून घेऊयात,
महाविकास आघाडी
राष्ट्रवादी शरद पवार - 12
उद्धव ठाकरे शिवसेना - 15 + 1 शंकरराव गडाख = 16
काँग्रेस - 37
एकूण - 65
महाविकास आघाडीला मतांची जुळवाजुळव करण्यासाठी चार किंवा त्यापेक्षा अधिक मतांची गरज पडेल.
छोटे घटक पक्ष
1) बहुजन विकास आघाडी - 3
2) समाजवादी पक्ष - 2
3) एमआयएम - 2
4) मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी - 1
5) शेतकरी कामगार पक्ष - 1
एकूण - 9
महाविकास आघाडी एकूण आमदार - 65
महाविकास आघाडीला पाठिंबा देऊ शकणारे पक्ष
1) समाजवादी 2
2) एमआयएम 2
3) मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी 1
4) शेतकरी कामगार पक्ष 1
महाविकास आघाडीला पाठिंबा देणारे पक्ष लक्षात घेऊन एकूण आमदार - 71 आमदार
महायुती आमदारांची संख्या
राष्ट्रवादी (अजित पवार) 41
भाजपा - 103
शिवसेना - 38
महायुती पाठींबा देणारे आमदार
राष्ट्रवादी (अजित पवार)
1) देवेंद्र भुयार
2) संजयमामा शिंदे
राष्ट्रवादी + अपक्ष - 43
भाजपला पाठिंबा देणारे आमदार
1) रवी राणा
2) महेश बालदी
3) विनोद अग्रवाल
4) प्रकाश आवाडे
5) राजेंद्र राऊत
6) विनय कोरे
7) रत्नाकर गुट्टे
भाजप + मिञ पक्ष आणि अपक्ष- 103+ 7 = 110
एकनाथ शिंदे शिवसेना- 38
पाठिंबा देणारे आमदार - 10
1) नरेंद्र भोंडेकर
2) किशोर जोरगेवार
3) लता सोनवणे
4) बच्चू कडू
5) राजकुमार पटेल
6) गीता जैन
7) आशीष जैसवाल
8) मंजुळा गावीत
9) चंद्रकांत निंबा पाटील
10) राजू पाटील
एकूण - शिवसेना + मिञ पक्ष आणि अपक्ष = 38+ 10 = 48
महायुती एकूण आमदार - 201
महायुतीला आपले नऊ उमेदवार निवडून आणण्यासाठी आणखी सहा मतांची गरज पडणार आहे. त्यामुळे अपक्ष आमदारांवर महायुती या सगळ्यासाठी अवलंबून असेल.