Pravin Darekar : आपल्या पक्षाला चांगल्या जागा मिळाव्यात. चांगली मंत्रीपदं मिळावीत, यासाठी प्रत्येक पक्ष प्रयत्न करत असतो. मात्र तिन्ही पक्षांची असणारी गरज संख्याबळ या सगळ्यांचा विचार करून एकमेकांकडे मागणी होईल असे वक्तव्य भाजप नेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी केलं. आमचे केंद्रीय नेतृत्व कोणाला नेमकं काय देणार? याबाबतचा निर्णय महाराष्ट्रातील नेतृत्वाशी चर्चा करुन निर्णय घेईल असे दरेकर म्हणाले. महायुतीतील तिन्ही पक्षांमध्ये उत्तम समन्वय होता आणि पुढेसुद्धा राहील असे दरेकर म्हणाले. महायुती बैठकीबाबत देखील दरेकरांना विचारण्यात आलं. यावेळी दरेकर म्हणाले की, बैठक कधी होईल हे मला माहित नाहीय
शपथविधी नेमका कधी होईल याबद्दल माहिती नाही
शपथविधी नेमका कधी होईल याबद्दल माहिती नाही, पण लवकरच होईल असे दरेकर म्हणाले. एवढं मोठ बहुमत आम्हाला दिलं आहे, त्यामुळं फारशी घाई, नाही पाच वर्षाचे निर्णय आम्हाला घ्यायचे आहेत. त्यामुळं योग्य निर्णय आमच्याकडून घेतले जातील. तिन्ही पक्षांमध्ये उत्तम समन्वय होता आणि पुढेसुद्धा राहील असे दरेकर म्हणाले. मीडियाच्या माध्यमातून कळते की देवेंद्र फडणवीस यांचे नाव मुख्यमंत्री पदासाठी अंतिम झालं आहे. पण आमचे वरिष्ठ जेव्हा अधिकृतपणे या सगळ्यावर निर्णय सांगतात, तेव्हा आमच्याकडून त्यावर बोलले जाते असे दरेकर म्हणाले.
मंत्रीपदाबाबत काय म्हणाले दरेकर?
मंत्रीपदाबाबत देखील प्रविण दरेकरांना विचारण्यात आले. यावेळी दरेकर म्हणाले की, हा विषय माझ्या पातळीवरचा नाही. आमचं केंद्रीय नेतृत्व आणि राज्याचे नेतृत्व प्रदेशाध्यक्ष यांच्या निवड प्रक्रियेतून मंत्रीपद दिलं जातं. योग्य क्षमता आणि गरजेनुसार हे पद दिले जातं असे दरेकर म्हणाले. मी कुठलाही आग्रह केला नाही किंवा इच्छा तशी व्यक्त केली नाही. पक्षात आल्यानंतर मी काही तरी द्या, असं म्हटलं नाही. कधीही आग्रह किंवा इच्छा व्यक्त केली नाही. क्षमता ज्याची आहे त्याला मिळणार असल्याचे दरेकर म्हणाले.
दोन्ही सहयोगी पक्षाच्या गटनेते पदाची नियुक्ती झाली आहे. त्यामुळं आमच्याही पक्षाला गटनेता नेमायची गरज आहे. दिल्लीच्या नेत्यांकडून जे काही आदेश आले आहेत, त्यानुसार भाजपची बैठक होऊन गटनेता निवडला जाईल असे दरेकर म्हणाले.
वक्फ बोर्ड जीआर प्रकाराबद्दल माहिती नाही
वक्फ बोर्ड जीआर प्रकाराची मला माहिती नाही. पण जेव्हा मुख्यमंत्री काळजीवाहू असतात तेव्हा शासन दरबारी अशा प्रकारचे शासन निर्णय काढले जात नाही. तेव्हा असा कसा जीआर काढण्यात आला याबद्दल माहिती घ्यावी लागेल असे दरेकर म्हणाले.