Jalgaon Political News : शिवसेनेसोबत बंडखोरी करीत आमदार किशोर पाटील (MLA Kishor Patil) हे शिंदे गटात सहभागी झाले आहेत. असे असताना दुसरीकडे मात्र कधीही राजकारणात सक्रिय नसलेल्या आमदार किशोर पाटील यांच्या चुलत बहिण वैशाली सूर्यवंशी (Vaishali Suryawanshi) यांनी आपण उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासोबत एकनिष्ठ असल्याचे स्पष्ट केलं आहे 


उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देण्यात खंड पडणार?
गेले तीस वर्ष पासून त्यांचे वडील हे शिवसेनेत सक्रिय राहिले आहेत. त्यांनी नेहमीच उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आमदार किशोर पाटील हे देखील नेहमी त्यांना शुभेच्छा देत राहिले आहेत, यंदा मात्र ते शिंदे गटात गेल्याने उद्धव ठाकरे यांना शुभेच्या देण्यात खंड पडणार असल्याचं लक्षात आल्यावर आपण पाचोरा शहरात फलक लावून त्यांना शुभेच्छा देण्याचा प्रयत्न केला आहे,


बहिणीचे उद्धव ठाकरेंना समर्थन


वैशाली सूर्यवंशी यांनी वाढदिवसानिमित्त उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या असून, ही शुभेच्छा फलक पाचोरा शहरात ठिकठिकाणी झळकली असल्याची पाहायला मिळत आहे. यामुळे आमदार किशोर पाटील यांना पाठिंबा न देता त्यांच्या बहिण वैशाली सूर्यवंशी यांनी उद्धव ठाकरे यांना समर्थन दिल्याच पाहायला मिळत आहे. एकाच कुटुंबातील असलेल्या वैशाली सूर्यवंशी या बहिणीने भाऊ आमदार किशोर पाटील यांना पाठिंबा न दर्शवता उद्धव ठाकरे यांना समर्थन देत वेगळी वाट निवडल्याने जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडाली आली आहे
     
पक्षाने संधी दिल्यास सक्रिय राजकारणात येण्याचे संकेत
वैशाली सूर्यवंशी यांनी आज अचानक राजकीय बॅनर बाजी केली असल्याने, तसेच पक्षाने संधी दिल्यास सक्रिय राजकारणात येण्याचे संकेत सुद्धा दिल्याने आगामी काळात आमदार किशोर पाटील आणि बहिण वैशाली पाटील यांच्यात पाचोऱ्यात सामना रंगला तर नवल वाटायला नको.


इतर महत्वाच्या बातम्या


Ajit Pawar : शेतकरी संकटात असताना राज्यात मंत्रिमंडळ विस्तार का करत नाही? अजित पवारांचा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना सवाल