Maharashtra Live News Update : राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर...
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
Kolhapur News : कोल्हापूरमधून संजय मंडलिक हातकणंगलेमधून धैर्यशील माने यांना विजयी करण्याचा कोल्हापूरकरांनी ठरवलं आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. हातकणंगले आणि कोल्हापूरमधून उमेदवारी विजयी करून दिल्लीला पाठवतील. तिसऱ्यांदा पंतप्रधान मोदींना संधी देऊन त्यांचे हात बळकट करणार आहोत. कडाक्याच्या उन्हातही मोठ्या संख्येने मतदार जमले, कोल्हापूर, हातकणंगले लोकसभा मतदारसंघ आज एकत्र जमले. आमदार प्रकाश आवाडे, कोरे, यड्रावकर, खासदार महाडिक, हे सगळे एकत्र आले. आमदार आवाडे यांच्याबद्दल कोणाला शंका कुशंका असायची गरज नाही. ही निवडणूक देशाच्या विकासाची आहे, ही निवडणूक रयतेची आहे. त्यामुळे कोल्हापूरकर दोन्ही खासदार निवडून देतील असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
मुंबई : उत्तर मुंबई महायुतीचे उमेदवार पीयुष गोयल यांचा आज बोरिवली रेल्वे स्टेशनवर काम करणारे बूट पॉलिश कामगार संघ युनियन सोबत बोरिवलीमध्ये संवाद कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या संवाद कार्यक्रमांमध्ये मोठ्या संख्येने बूट पॉलिश काम करणाऱ्या कामगार आपली उपस्थिती लावून यावेळी आपली समस्या पीयुष गोयल यांच्याकडे मांडलं. आचारसंहिता संपल्यानंतर या सर्व बूट पॉलिश काम करणारे कामगारांची समस्या दूर करण्याचं आश्वासन कामगारांना यावेळी पीयुष गोयल यांनी दिलं आहे. यावेळी बूट पॉलिश करणारे कामगारांकडून आपकी बार 400 पार आणि एक बार फिर मोदी सरकार अशी घोषणाबाजी देण्यात आली.
नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज काटोल येथे माजी मंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते रणजित देशमुख यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी गडकरी यांनी रणजितबाबू यांच्या तब्येतीची विचारपूस केली.
सांगली : सांगलीत आज होणाऱ्या मविआच्या प्रचार मेळाव्यावर काँग्रेसची बहिष्काराची भूमिका नाही
नागरपुला सर्व प्रमुख कॉंग्रेस नेत्यांना बैठकीसाठी बोलावणे आल्याने कॉंग्रेस नेत्यांना मेळाव्याला जाता येणार नाही
कॉंग्रेसचे नेते विश्वजित कदम याची एबीपी माझाला माहिती
Mumbai Crime News : मुंबई पोलीस आयुक्तालयात सलमान खान घराबाहेर गोळीबार प्रकरणी बैठक
क्राइम ब्रांच पोलीस अधिकारी आणि पोलीस आयुक्त यांच्याशी बैठक सुरू असल्याची माहिती
गोळीबार प्रकरणाचा आतापर्यंतचा तपास, पुढील तपास आणि सलमान खानची सुरक्षा यासंदर्भात या बैठकीत चर्चा
हे प्रकरण वांद्रे पोलिसांकडून क्राइम ब्रांचकडे वर्ग करण्यात आले आहे, क्राईम ब्रांचचे वेगवेगळ्या टीम तपास करत आहेत
ठाणे : ठाण्यातील माजिवाडा परिसरात सकाळी 10 वाजताच्या सुमारास नाशिककडून मुंबईकडे येणाऱ्या रोडवरती माजिवाडा ब्रिज जवळ असलेल्या हाईट बॅरियरला तीन चाकी टेम्पोने हाईट बॅरियरला धडक दिल्यामुळे अपघात झाला होता. या घटनास्थळी शहर वाहतूक पोलीस कर्मचारी आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी आणि अतिक्रमण विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. या घटनास्थळी टेम्पो चालकाला किरकोळ दुखापत झाली आहे. एक व्यक्तीच्या चेहऱ्याला किरकोळ दुखापत झाली असून, श्रीहरी क्लिनिक, वागळे इस्टेट, ठाणे येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनास्थळी हाईट बॅरियरला धडकून अपघातग्रस्त झालेला तीन चाकी टेम्पो हायड्रा मशीनच्या सहाय्याने तसेच, वाहतूक पोलीस कर्मचारी आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी यांच्या मदतीने रोडच्या बाजूला करण्यात आला आहे.नाशिक-मुंबई रोड वाहतुकीसाठी पूर्णपणे सुरळीत करण्यात आला आहे.
Sangli Lok Sabha Election 2024 : सांगलीतील महाविकास आघाडीच्या जागेवरून काँग्रेसमध्ये देखील आता खलबतं सुरू असल्याचं दिसून येतं. सांगलीत आज महाविकास आघाडीचा मेळावा पार पडणार आहे. परंतु या मेळाव्यावर सांगलीतील काँग्रेसने बहिष्कार टाकलाय. त्यामुळे सांगलीत महाविकास आघाडीमध्ये प्रचंड असंतोष असल्याचं दिसून येतं. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी सांगलीतील काँग्रेस नेत्यांना बोलावणं धाडलं आहे. त्यामुळे विश्वजीत कदम, विक्रम सावंत आणि पृथ्वीराज पाटील हे काही वेळात नागपूरकडे रवाना होणार आहेत. विशाल पाटील यांना देखील बोलावण्यात आलं होतं. परंतु विशाल पाटील हे उद्या अर्ज भरणार असल्याने ते नागपूरला जाणार नाहीत. आज रात्री नागपूरमध्ये काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेनीथल्ला, बाळासाहेब थोरात, नाना पटोले, विश्वजीत कदम, विक्रम सावंत आणि पृथ्वीराज पाटील यांच्यात बैठक पार पडणार आहे. या बैठकीत काय होणार हे देखील पाहणं औचित्याचं असणार आहे. उद्या विशाल पाटील हे अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याने आज नागपूरमध्ये पार पडलेल्या बैठकीत नेमकं काय ठरतं याकडे देखील सर्वांचे लक्ष लागून राहिलंय.
Vanchit Bahujan Party Manifesto : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी अकोला येथे आज पत्रकार परिषद घेऊन पक्षाचा जाहीरनामा प्रकाशित केला.
Raigad Lok Sabha Election 2024 : रायगडमधून लोकसभेचे इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांच्या उमेदवारीचा अर्ज दाखल करण्यासाठी आज इंडिया आघाडीकडून अलिबागच्या शेतकरी कामगार पक्षाच्या भवनातून सुरुवात झालीय. यामध्ये शिवसेना नेते भास्कर जाधव, शेकापचे जयंत पाटिल माजी आमदार संजय कदम, पंडित पाटिल अनिल तटकरे समाजसेविका उल्का महाजन देखील सामील झालेत. छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून काँग्रेसचे नेते मधुकर ठाकूर यांच्या घरी यावेळी गितेंनी सदिच्छा भेट देऊन उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मार्गस्थ केलं. याप्रसंगी त्यांच्यासमवेत इंडिया आघाडीतील सर्व घटक पक्षाचे नेते कार्यकर्ते मोठ्या संख्येने दाखल झालेत.
वाशिम : वाशिम यवतमाळ लोकसभा मतदारसंघाच्या खासदार भावना गवळी यांची उमेदवारी नाकारण्यात आली होती. खासदार भावना गवळी यांनी पत्रकार परिषद घेऊन उमेदवारी न मिळायची खंत व्यक्त केली होती. मात्र, मुख्यमंत्री यांनी भावना गवळी यांची मनधरणी केली आणि मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या शब्दानंतर आता भावना गवळी यांची नाराजी दूर झाली. त्यानंतर गवळी ह्या प्रचारासाठी उतरणार असल्याचे त्यांनी सांगितलं होतं. आज त्यांची भेट घेण्यासाठी मंत्री उदय सामंत आणि हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील हे आज भावना गवळी यांच्या वाशिम येथील कार्यालयात जाऊन त्यांची भेट घेतली आहे त्यानंतर खऱ्या अर्थाने प्रचाराला सुरुवात करणार मात्र उदय सामंत आणि हेमंत पाटील आणि भावना गवळी यांची काय चर्चा होते पाहावं लागेल.
Beed Lok Sabha Election 2024 : बीड लोकसभा निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अशोक हिंगे यांनी केजमध्ये जाऊन काँग्रेसचे नेते अशोक पाटील यांची भेट घेतली असून बीडमध्ये काँग्रेस पक्ष वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा देणार का असे विचारल्यानंतर काँग्रेस पक्ष यावर निर्णय घेईल असं वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अशोक हिंगे यांनी म्हटले आहे. निवडणूक प्रचार आणि बैठकीसाठी अशोक हिंगे हे केज शहरात गेले होते. यावेळी त्यांनी अशोक पाटील यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतल्याने बीडमध्ये राजकीय चर्चा रंगू लागले आहेत.
Letter from 21 Former Judges to Chief Justice : "भारतीय न्यायव्यवस्थेवर दबाव, न्यायव्यवस्थेला दबावातून वाचवण्याची गरज"
"भारतीय न्यायव्यवस्थेवर राजकीय फायद्यासाठी, स्वतःच्या स्वार्थासाठी दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातो आहे"
"न्यायाधीशांची प्रतिमा मलिन करण्याचे प्रयत्न सुरू आहेत"
"आम्ही सगळे न्यायव्यवस्थेसोबत"
सरन्यायाधीशांना उद्देशून सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाच्या 21 माजी न्यायमूर्तींचे पत्र
सातारा : शरद पवार साताऱ्यात दाखल
सैनिक स्कुलच्या हेलिपॅडवर दाखल
महाविकास आघाडीचे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शरद पवार साताऱ्यात दाखल
काही वेळात रॅलीला होणार सुरुवात
पुणे : पुण्यात रवींद्र धंगेकर आणि वसंत मोरे यांचा मिसळवर ताव
प्रचारादरम्यान दोन्ही उमेदवारांनी मुरलीधर मोहोळ यांच्या प्रभागात जाऊन घेतला मिसळपावचा आनंद
पुण्याची राजकीय संस्कृती जपणारा व्हिडिओ वसंत मोरे यांच्याकडून पोस्ट
काल पुणे लोकसभा मतदारसंघाच्या प्रचारादरम्यान दोन्ही उमेदवारांनी एकत्र बसून खाल्ली मिसळ
व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
मुंबई : लोकसभेसाठी मराठा महासंघ महायुतीला पाठिंबा देणार
मराठा महासंघाचे अध्यक्ष दिलीप जगताप आणि महायुती मधील प्रमुख नेत्यांची दुपारी 2 वाजता पत्रकार परिषद
भाजपच्या प्रदेश कार्यालयात होणार पत्रकार परिषद
या पत्रकार परिषदेत मराठा महासंघाकडून महायुतीला 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर पाठिंबा जाहीर केला जाणार
मुंबई : मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांचं उद्धव ठाकरे यांना पत्र
कधीही आपल्या राजकीय भूमिकांमध्ये बदल न केल्याबद्दल आपला दुधाने अभिषेक करण्यास वेळ मिळण्याबाबती गजानन काळे यांचं उद्धव ठाकरे यांना पत्र
सातारा : महाविकास आघाडीचे साताऱ्यातील उमेदवार शशिकांत शिंदे यांचा उमेदवारी अर्ज आज रॅली काढून भरला जाणार आहेत. या रॅलीमध्ये शरद पवार हे उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर महाविकास आघाडीच्या घटक पक्षातील प्रमुख नेतेमंडळी ही या रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत. राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आमदार बाळासाहेब पाटील, खासदार श्रीनिवास पाटील यांच्यासह मित्र पक्षातील ही प्रमुख नेतेमंडळी उपस्थित राहणार आहेत. या रॅलीचे स्वरूप भव्यदिव्य असावं यासाठी खास रथाची सोय करण्यात आलेली आहे. आणि रथातून ही रॅली साताऱ्यातील मुख्य रस्ता समजल्या जाणाऱ्या राजपथावरून निघणार आहे. या रॅलीमुळे सातारा शहरातील वाहतूक व्यवस्था बिघडली जाणार आहे.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे आप्पासाहेब जगदाळे आणि हर्षवर्धन पाटील यांचे निकटवर्तीय भरत शाह शरद पवारांच्या गोठात?
कृषी उत्पन्न बाजार समितीत वर्चस्व असणारे आप्पासाहेब जगदाळे शरद पवारांना साथ देणार
भरत शाह यांचे इंदापूर शहारत वर्चस्व
उद्या इंदापुरात शरद पवारांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होण्याची शक्यता
आज दुपारी एक वाजता आप्पासाहेब जगदाळे पत्रकार परिषदेत भूमिका जाहीर करणार
Lok Sabha Election 2024 : छत्रपती संभाजीनगर लोकसभेची जागा महायुतीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे जाणार असल्याची माहिती मिळत आहे. विशेष म्हणजे स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना संभाजीनगरच्या निवडणुकीची तयारी करा, कार्यकर्त्यांचे मेळावे घ्या, असे निर्देश दिले आहेत. बुलढाणा येथील प्रचारसभा आटोपून मुख्यमंत्री शिंदे मुंबईला जाण्यासाठी रात्री उशिरा संभाजीनगरच्या चिकलठाणा विमानतळावर आले होते. यावेळी आमदार संजय शिरसाट, विनोद पाटील राजेंद्र जंजाळ यांच्यासह शिंदेसेनेचे काही महत्त्वाचे नेते मुख्यमंत्र्यांना भेटले. यावेळी संभाजीनगरची जागा आपलीच असून, तयारीला लागा, असे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संजय शिरसाट आणि विनोद पाटील यांच्याशी स्वतंत्र चर्चा देखील केली.
धाराशिव : ठाकरे गटाचे ओमराजे निंबाळकर मंगळवारी, 16 एप्रिलला उमेदवारी अर्ज दाखल करणार
युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे, रोहित पवार, अमित देशमुख हे राहणार उपस्थित
बाईक रॅली सह शक्ती प्रदर्शन करून करणार दाखल उमेदवारी अर्ज
Lok Sabha Election 2024 : जळगाव जिल्ह्यातील अमळनेर आणि चोपडा परिसरातील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील तसेच शरद पवार गटातील जवळपास 400 कार्यकर्त्यांनी आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत काल रात्री उशिरा शिंदे गटात प्रवेश केला. यावेळी मंत्री गुलाबराव पाटील, बुलढण्याचे खासदार प्रतापराव जाधव आणि माजी आमदार चिमणराव पाटील उपस्थित होते. हे सर्व कार्यकर्ते जवळपास 60 ते 70 वाहनातून बुलढाण्यात पोहोचले होते. बुलढाणा येथील बुलढाणा रेसिडेन्सी क्लब येथे पार पडलेल्या पक्षप्रवेश समारोहाच्या वेळी मोठी घोषणाबाजी झाली. मात्र यामुळे जळगाव जिल्ह्यात ठाकरे गटाला मोठा धक्का पोहोचला आहे.
विरार : पालघर लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार भारती कामडी यांचा गाठीभेटींवर भर देताना दिसत आहेत. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त भारती कामडी यांनी वसई-विरारमधील प्रत्येक भीम जयंती कार्यक्रमामध्ये हजेरी लावली. वसई-विरारमधील चर्च, मंदिर, मधील धर्मगुरु, महाविकास आघाडीतील घटक पक्ष पदाधिकारी यांच्याही कामडी यांनी भेटी घेत प्रचार करत आहेत. महायुती किंवा वंचित यांनी आपला उमेदवार निश्चित केला नसल्याने सध्या पालघर लोकसभा निवडणुकीत भारती कामडी यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे.
छत्रपती संभाजीनगर : शिवसेना नेतेपदी निवड झाल्यानंतर आज पहिल्यांदाच विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे संभाजीनगर शहरात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी आणि महिला पदाधिकाऱ्यांनी औक्षण करून दानवे यांचे स्वागत केलं. क्रेनच्या सहाय्याने मोठा हार घालून त्यांचं विमानतळावर स्वागत देखील करण्यात आलं. दरम्यान, माझ्यासारख्या एका शिवसैनिकाला हे पद मिळालं हे फक्त शिवसेनाप्रमुखांच्या विचारामुळेच माझ्यासारख्या मराठवाड्यातील एका व्यक्तीवर जबाबदारी टाकली आणि मला ही संधी मिळाल्याने मी खरंच नशीबवान आहे आणि माझं भाग्य असल्याचं देखील दानवे यावेळी म्हणाले.
दिल्ली : अरविंद केजरीवाल यांच्या ED कडून अटकेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे. न्यायमूर्ती दिपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या न्यायपीठासमोर अरविंद केजरीवाल यांच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे. ED ने केलेल्या अटकेला आव्हान देणारी याचिका अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केली होती. त्यावर अरविंद केजरीवाल यांची अटक योग्य तसेच वैध असल्याचा निवाडा दिल्ली उच्च न्यायालयाने केला होता आणि केजरीवाल यांची याचिका फेटाळली होती. त्यानंतर केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते.
छत्रपती संभाजी नगर : एरवी पाणीच पाणी असणाऱ्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुका ही यावर्षी दुष्काळात होरपळतोय. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि पणन मंत्री अब्दुल सत्तार यांचा हा मतदारसंघ. तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाणी प्रश्न बिकट होतोय. तालुक्यातील दुर्गम भागात असलेले आणि तीनशे लोकांची वस्ती असलेले सावरखेडा (ब) पांढरी या गावात अक्षरशः महिलांना दीड ते दोन किलोमीटर पायपीट करून दोनशे फुटाच्या दरी मध्ये खाली उतरून हंडाभर पाण्यासाठी जीवघेणी कसरत करावी लागत आहे. त्यातच त्यात तुबेलेलं पाणी अशुद्ध आणि गढूळ असल्याने त्याना तेच पाणी पिण्याची नामुष्की ओढवून आली आहे. या ठिकाणी वृद्ध महिला, लहान लहान मूले देखील हंडाभर पाण्यासाठी जीवावर उदार होऊन पाण्यासाठी भटकंती करत आहे.
Water Crisis : मागच्या वर्षीच्या तुलनेत मराठवाड्यातील पाणीसाठ्यात मोठी घट
उत्तर महाराष्ट्रातही पाण्याची पातळी घटली, धरणांमधील पाणीसाठा कमी
मराठवाड्यात गत वर्षी 42 टक्क्यांवर असलेला पाणीसाठा यंदा मात्र फक्त 16 टक्क्यांवर
उत्तर महाराष्ट्रात मागील वर्षी याचदिवशी 50 टक्क्यांवर असलेला धरणसाठा यंदा मात्र 35 टक्के
पश्चिम महाराष्ट्रातील पाणीसाठा 31 टक्क्यांवर, मागच्या वर्षी धरणांमध्ये जवळपास 39 टक्के जलसाठा होता
Lok Sabha Election 2024 : उत्तम जानकर आज देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. भाजप सोलापूर मधून निवडणुकीची तयारी करण्यासाठी सांगितलं होतं, तशी आम्ही तयारी देखील सुरू केली. पण अचानक आम्हाला तिकीट नाकारलं. माढा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघात धनगर समाजाचे प्राबल्य आहे. धनगर समाजाचा या निर्णयामुळे रोष आहे. आज देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन मुंबईत ऑपरेशन होते की दिल्लीला ऑपरेशन होते हे ठरेल. देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलल्यानंतर आम्ही कार्यकर्त्यांशी बोलून पुढील निर्णय घेऊ, असं उत्तमराव जानकर म्हणालेत. बारामतीतून मुंबईच्या दिशेने जाताना उत्तमराव जानकर यांनी माध्यमांशी संवाद साधला.
पार्श्वभूमी
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -