Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 मुंबई: राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024) एकूण 288 जागांसाठी मतदान झाले. यातपैकी तब्बल 132 जागांवर भाजपाने दणदणीत विजय नोंदवला आहे. या जागांसह भाजपा हा राज्यातील सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे. सलग तिसऱ्या निवडणुकीत भाजपाने 100 पेक्षा अधिक जागा मिळवल्या आहेत. या निवडणुकीत भाजपनंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा पक्ष दुसरा सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे. या पक्षाला एकूण 57 जागा मिळाल्या आहेत. तर अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पक्षाला एकूण 41 जागांवर विजय मिळाला आहे. 


विधानसभेच्या निकालानंतर आता मुख्यमंत्रि‍पदापासून मंत्रिमंडळाच्या फॉर्म्युलावर देखील महायुतीमध्ये चर्चा सुरु झाली आहे. महायुतीमध्ये मंत्रिमंडळाचा अंदाजित फॉर्म्युला 21, 12, 10 असा असू शकतो. यात भाजपला सर्वाधिक 21 मंत्रिपदे, त्यानंतर शिवसेनेला 12 आणि राष्ट्रवादीला 10 मंत्रिपदं मिळण्याची शक्यता आहे. ही प्राथमिक चर्चा असून यामध्ये प्राथमिक केलेली वाटाघाटी असल्याचं सांगण्यात येत आहे. यामध्ये आज तिन्ही मुख्य नेते आणि दिल्लीतील वरिष्ठ नेते यांच्याशी चर्चा करून बदल होऊ शकतो. मात्र सध्या तरी हा फॉर्म्युला विचाराधीन आहे.


एकत्र चर्चा करुन निर्णय घेऊ- एकनाथ शिंदे


राज्यातील विधानसभेचा कार्यकाळ 26 तारखेला संपत असल्यामुळे एक दिवस आधीच महायुती सरकार स्थापन करणार असल्याची माहिती एबीपी माझाला विश्वनीय सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे, मुख्यमंत्री कोण होणार हे पुढील 3 दिवसांतच स्पष्ट होईल, असे दिसून येते. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही मुख्यमंत्रीपदावर दावा केला आहे.पंतप्रधान मोदी, अमित शाह आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष जे.पी.नड्डा आणि तिन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते एकत्र बसून चर्चा करतील. आम्ही जशी निवडणूक लढलो तसा मुख्यमंत्रीपदाबाबतही एकत्र चर्चा करुन निर्णय घेऊ, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले.


कोणत्या पक्षाचा किती जागांवर विजय झाला?


महायुती- 236
महाविकास आघाडी- 49
इतर- 3
---------------------
भाजप- 132


शिवसेना (शिंदे गट)- 57


राष्ट्रवादी (अजित पवार गट)- 41


काँग्रेस- 16


राष्ट्रवादी (शरद पवार गट)- 10


शिवसेना (ठाकरे गट)- 20


समाजवादी पार्टी- 2


जन सुराज्य शक्ती- 2


राष्ट्रीय युवा स्वाभीमान पार्टी- 1


राष्ट्रीय समाज पक्ष- रासप- 1


एमआयएम- 1 जागा


सीपीआय (एम)- 1


पिजन्ट्स अँड वर्कर्स पार्टी ऑफ इँडिया- पीडब्ल्यूपीआय- 1


राजर्षी शाहू विकास आघाडी- 1 


अपक्ष- 2


संबंधित बातमी:


Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024: शरद पवार, संजय राऊत, प्रियंका चतुर्वेदींची पुढची खासदारकी टर्म धोक्यात; महाविकास आघाडीला धक्का