Maharashtra Monsoon Session 2025: राज्याचं पावसाळी अधिवेशन (Maharashtra Monsoon Session 2025) सध्या मुंबईत सुरु आहे. आज (15 जुलै) विधासभेत मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) आणि ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेंसह (Aditya Thackeray) वरुण सरदेसाई (Varun Sardesai) यांच्यात जोरदार राडा झाला. यावेळी मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) शंभूराज देसाई यांच्या मदतीला धावऊ आले.  

Continues below advertisement


मुंबई वांद्रे परिसरात 42 एकर जमीन डिफेन्स लँड संरक्षण विभागाची मालकी असल्याने 9483 झोपड्यांचे पुनर्वसन रखडल आहे. ही लक्षवेधी वरुण सरदेसाई यांनी मांडली. यावर मंत्री शंभूराज देसाई यांनी 2019 ते 2022 साली एकदा ही याबाबत तत्कालीन सरकारने बैठक घेतली नसल्याचं सांगितलं. यावरुन वरुण सरदेसाई यांच्यासह आदित्य ठाकरे चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळाले. मंत्र्यांनी जे पत्रकात आहे, तेच सभागृहात सांगितलं. त्यांना चांगलं ब्रिफिंग मिळालं नसेल, असं वरुण सरदेसाई म्हणाले. तुम्हाला उत्तर ऐकायचं नाहीय का?, असं म्हणत शंभूराज देसाई रागाने खाली बसले. यानंतर मंत्री गुलाबराव पाटील देखील शंभूराज देसाईंच्या मदतीला धावले. छातीवर हात मारत लाज काढण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिलाय?, तुम्ही जन्मताच शिकले का? असा सवाल गुलाबराव पाटील यांनी उपस्थित केला. 


शंभूराज देसाईंचा आक्रमक पवित्रा-


तुम्ही 2019 ते 2022 पर्यंत काय केले? याबाबत सांगा. एकदाही पत्र दिले नाही. एकदाही पाठपुरावा केला नाही. त्यावेळी कोणाचे सरकार होते? 2022 साली एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर चार वेळा आम्ही पत्र दिली. तुम्ही काय केले? आमचे लाज काढू नका. तुम्ही काय केले ते सांगा? असे म्हणत शंभूराज देसाई यांनी देखील आक्रमक भूमिका घेतली. मी 2019 ते 2022 यावेळेत पाठपुरावा झाला नाही, हे मी म्हटलो.⁠ जर मी कोणाचं नाव घेतलं नाही तर मग एवढी नाकाला मिरची लागायचं कारण काय? असा सवालही शंभूराज देसाईंनी उपस्थित केला.


धंदे आता बंद करा, जनतेची प्रश्न सोडवा- वरुण सरदेसाई


विधानसभा सभागृहच्या बाहेर येत वरुण सरदेसाईंनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी वांद्रे मधील 42 एकर डिफेनच्या जमिनीचा प्रश्न मी विचारला आणि गृहनिर्माण विभागाकडून हे उत्तर अपेक्षित होतं. अर्धा तास लक्षवेधी झाली. मात्र प्रश्नच उत्तर मिळालं नाही किंवा तो प्रश्न सोडवला गेला नाही. आम्ही आमच्या मतदारसंघातले प्रश्न सोडवायला विधानसभेत येतो, हे हक्काचं  विधिमंडळ आहे जिथे जनतेचे प्रश्न सोडवले जातील. पण इथे 2019 ला काय झालं 2022 ला काय झालं हे सुरू आहे. हे धंदे आता बंद करा, जनतेची प्रश्न सोडवा, असं वरुण सरदेसाईंनी सांगितले. 




संबंधित बातमी:


Maharashtra Honey Trap: राज्यातील 72 वरिष्ठ अधिकारी, माजी मंत्री हनी ट्रॅपच्या जाळ्यात? महिलेचा व्हिडीओबाबत खळबळजनक दावा