मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याची अधिसूचना (Maharashtra Lok Sabha Election 2024 Notification) आज निघणार असून आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरूवात होणार आहे. त्यामध्ये पहिल्या टप्प्यात पूर्व विदर्भातील नागपूर, रामटेक, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा-गोंदिया या पाच लोकसभा मतदारसंघासाठी 19 एप्रिल रोजी मतदान होणार असून या मतदारसंघांसाठी ही अधिसूचना लागू होणार आहे. 


सन 2019 मध्ये नागपूर लोकसभेसाठी 30 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. तर रामटेक लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात 2019 मध्ये 16 उमेदवार निवडणुकीत होते. 


या टप्प्यात भाजपकडून नागपुरातून नितीन गडकरी, चंद्रपुरातून सुधीर मुनगंटीवार हे उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. मात्र भंडारा-गोंदिया तसेच गडचिरोली लोकसभा मतदारसंघातून भाजपचा उमेदवार कोण राहणार याचा सस्पेन्स कायम आहे. रामटेक संदर्भातही महायुतीचा निर्णय होऊ शकलेला नाही.


महाविकास आघाडीकडून पहिल्या टप्प्यातील पाच लोकसभा मतदारसंघासाठी अजूनही एकही उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही.


असा असेल निवडणूक कार्यक्रम


आजपासूनच नामनिर्देशन पत्र स्वीकारले जात आहेत. 27 मार्चपर्यंत उमेदवारांना त्यांचे उमेदवारी अर्ज दाखल करता येईल. 28 मार्च रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होईल. तर 30 मार्च उमेदवारी अर्ज परत घेण्याची अखेरची मुदत असणार आहे.


विशेष म्हणजे 20 मार्च ते 27 मार्च उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या कालावधीमध्ये तीन दिवस प्रशासनिक सुट्टी आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांना पाचच दिवस मिळणार आहेत. 


देशात पाच टप्प्यात तर राज्यात सात टप्प्यात मतदान


देशातील सात टप्प्यांतील मतदानापैकी महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यात मतदान होणार असून राज्यात पाच टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. देशात 19 एप्रिल ते 1 जून असे 7 टप्प्यात तर महाराष्ट्रात 19 एप्रिल ते 20 मे पर्यंत पाच टप्प्यात पार पडणार आहे. महाराष्ट्रात 19 एप्रिल, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे, 20 मे मे या पाच टप्प्यात मतदान होणार आहे. 


महाराष्ट्रात 5 टप्प्यात मतदान


महाराष्ट्रात 19 एप्रिल ते 20 मे या दरम्यान लोकसभ निवडणुका पार पडणार आहेत. तुमच्या भागात मतदान कधी होणार, हे जाणून घ्या.


पहिला टप्पा : 19 एप्रिल एप्रिल


महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यातील मतदान 19 एप्रिलला होणार असून यावेळी पाच मतदारसंघात मतदान होणार आहे. 19 एप्रिलला विदर्भातील सहा मतदार संघात मतदान पार पडणार आहे. रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर आणि चंद्रपूर 19 एप्रिलला


दुसरा टप्पा : 26 एप्रिल 2024


राज्यात 26 एप्रिल 8 मतदारसंघात मतदान होणार असून यावेळी वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, अकोला, अमरावती, बुलढाणा या मतदारसंघात मतदान होईल.


तिसरा टप्पा : 7 मे 2024


राज्यात 7 मे रोजी 11 मतदारसंघात मतदान होणार आहे. रायगड, बारामती, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले या मतदारसंघात 7 मेला मतदान होईल.


चौथा टप्पा : 13 मे 2024


राज्यात नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी आणि बीड या 11 मतदारसंघात 13 मेला मतदान पार पडेल.


पाचवा टप्पा : 20 मे 2024


महाराष्ट्रातील पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान 20 मेला होईल. धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई दक्षिण, मुंबई उत्तर-पश्चिम, मुंबई उत्तर-पूर्व, मुंबई उत्तर-मध्य, मुंबई दक्षिण-मध्य मतदारसंघात 20 मे रोजी एकूण 13 मतदारसंघात मतदान पार पडेल.


ही बातमी वाचा :