मुंबई : राज्य सरकारकडून पालकमंत्र्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे आणि बीडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. गेल्या अनेक आठवड्यांपासून पालकमंत्रिपदाचा मुद्दा चर्चेत आला होता. विशेष म्हणजे पालकमंत्रिपदाच्या यादीतून मंत्री धनंजय मुंडे यांचा पत्ता कट करण्यात आलाय. 

Continues below advertisement

पालकमंत्र्यांची संपूर्ण यादी 

1. गडचिरोली - देवेंद्र फडणवीस 2. ठाणे - एकनाथ शिंदे 3. मुंबई शहर - एकनाथ शिंदे 4. पुणे - अजित पवार 5. बीड - अजित पवार 6. नागपूर - चंद्रशेखर बावनकुळे 7. अमरावती चंद्रशेखर बावनकुळे8. अहमदनगर - राधाकृष्ण विखे पाटील9. वाशिम - हसन मुश्रीफ10. सांगली - चंद्रकांत पाटील11. नाशिक - गिरीश महाजन12. पालघर - गणेश नाईक13. जळगाव -गुलाबराव पाटील14. यवतमाळ - संजय राठोड15. मुंबई उपनगर - आशिष शेलार  तर सहपालकमंत्री - मंगलप्रभात लोढा 16. रत्नागिरी - उदय सामंत 17. धुळे - जयकुमार रावल18. जालना - पंकजा मुंडे19. नांदेड - अतुल सावे20. चंद्रपूर - अशोक उईके 21.सातारा - शंभूराज देसाई22. रायगड - आदिती तटकरे23.लातूर - शिवेंद्रराजे भोसले 24. नंदूरबार - माणिकराव कोकाटे25.सोलापूर - जयकुमार गोरे26. हिंगोली - नरहरी झिरवाळ27. भंडारा - संजय सावकारे28. छत्रपती संभाजीनगर - संजय शिरसाट29. धाराशिव - प्रताप सरनाईक30. बुलढाणा - मकरंद जाधव31. सिंधुदुर्ग - नितेश राणे 32. अकोला - आकाश फुंडकर 33. गोंदिया -बाबासाहेब पाटील 34. कोल्हापूर - प्रकाश आबिटकर तर सह पालकमंत्री - माधुरी मिसाळ35. वर्धा - पंकज भोयर 36.परभणी - मेघना बोर्डिकर

गडचिरोलीचे पालकमंत्री पद मुख्यमंत्र्यांकडे तर बीड आणि पुण्याचे पालकमंत्रीपदी अजित पवार

Continues below advertisement

मुंबई शहर आणि ठाण्याचे पालकमंत्री पद एकनाथ शिंदेकडे

नागपूर आणि अमरावतीचे पालकमंत्री पदी चंद्रशेखर बावनकुळे असतील

छ.संभाजीनगर पालकमंत्री पद संजय शिरसाट यांच्याकडे तर पंकजा मुंडे यांच्याकडे जालन्याचा कारभार

मुंबई उपनगराचे दोघांकडे पालकत्व -आशिष शेलार यांच्याकडे पालकमंत्री पद तर मंगलप्रभात लोढा सहपालकमंत्री असणार

क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांना कोणतेही जिल्ह्याचे पालकमंत्री पद नाही किंवा सह पालकमंत्री पद देखील नाही.

मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर पालकमंत्री पदाची जबाबदारी नाही

नाशिकच्या पालकमंत्री पदाची धुरा अखेर गिरीश महाजन यांच्याकडे...

नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी गिरीश महाजन आणि दादा भुसे, माणिकराव कोकाटे या मंत्र्यांची नावे होते चर्चेत...

नाशिकच्या पालकमंत्री पदी गिरीश महाजन यांची वर्णी तर दादा भुसे यांच्याकडे कोणतीही जिल्ह्याची पालकमंत्री पदाची जबाबदारी नाही... यामुळे नव्या चर्चांना उधाण येण्याची शक्यता

इतर महत्त्वाच्या बातम्या 

मोठी बातमी! मारकडवाडीत वात पेटली, धग मात्र दिल्लीत, उत्तमराव जानकर 23 तारखेला आमदारकीचा राजीनामा देणार, जंतर मंतरवर करणार आंदोलन

Vinod Tawde : अमित शाह यांची तडीपारी देशभक्तीचे लक्षण; सावरकर मंत्री झाले असते तर शरद पवार असंच बोलले असते का? विनोद तावडेंचा पलटवार