पुणे: गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला मंत्रीमंडळ विस्तार (Maharashtra Cabinet expansion) आज (रविवारी) अखेर पार पडणार आहे. या मंत्रीमंडळ विस्तारामध्ये काही नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. तर काही श्रेष्ठ नेत्यांना डच्चू देण्यात आल्याच्या चर्चा आहेत. राज्यातील महायुती सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये (Maharashtra Cabinet expansion) नवे तेहरे दिसणार असून, काही चेहऱ्यांना या मंत्रिमंडळापासून जाणीवपूर्वक दूर ठेवले जाण्याची शक्यता गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात सुरू आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच आज शपथविधी करूनच सरकारच्या चहापान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही विद्यमान मंत्र्यांना मंत्रिमंडळाबाहेर ठेवतानाच नवीन चेहऱ्यांना संधी दिली जात आहे. या मंत्रिमंडळात भाजपचे 21, शिवसेनेचे 12 तर राष्ट्रवादी काँग्रेसचे 10 मंत्री शपथ घेण्याची शक्यता वर्तविली जात आहे. (Maharashtra Cabinet expansion)
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आत्तापर्यंत नव्या चार नावांचा समावेश
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाने मंत्रीमंडळात (Maharashtra Cabinet expansion) भाकरी फिरवल्याचं चित्र आहे. आत्तापर्यंत एबीपी माझाला मिळालेल्या माहितीनुसार मंत्रीमंडळाच्या शपथविधीसाठी सात नेत्यांना फोन आले आहेत. यातील चार चेहरे नवे आहेत. तर इतर तीन आमदार जुन्या आधी मंत्रीपदी राहिले आहेत. आत्तापर्यंत आदिती तटकरे, बाबासाहेब पाटील, हसन मुश्रीफ, नरहरी झिरवाळ मकरंद पाटील, इंद्रनील नाईक या नेत्यांना फोन आलेत त्यातील आदिती तटकरे, हसन मुश्रीफ, दत्तमामा भरणे या नेत्यांशिवाय बाकी आमदारांना मंत्रीमंडळात स्थान देण्यात आलं आहे. (Maharashtra Cabinet expansion)
भुजबळ आणि धनंजय मुंडे यांच्याबाबतची माहिती गुलदस्त्यात
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या यादीमध्ये पक्षाचे बडे नेते छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील आणि अजित पवारांचे निकटवर्तीय धनंजय मुंडे यांच्या नावाबाबतची माहिती किंवा समावेश नसल्याचं दिसत आहे. त्यामुळे या नेत्यांवर काही वेगळी जबाबदारी देणार की त्यांचा पत्ता कट झाला आहे, अशा चर्चा राजकीय वर्तुळात होताना दिसत आहे. (Maharashtra Cabinet expansion)
राष्ट्रवादीकडून मंत्रीपदासाठी फोन आलेले नेते
1. आदिती तटकरे 2. बाबासाहेब पाटील 3. दत्तमामा भरणे 4. हसन मुश्रीफ 5. नरहरी झिरवाळ6. मकरंद पाटील7. इंद्रनील नाईक
भाजपकडून कोणा कोणाला मंत्रिपदासाठी फोन-
(BJP Cabinet Minister List)
नितेश राणे शिवेंद्रराजे भोसले चंद्रकांत पाटील पंकज भोयरमंगलप्रभात लोढा गिरीश महाजन जयकुमार रावल पंकजा मुंडेराधाकृष्ण विखे पाटीलगणेश नाईकमेघना बोर्डीकरजयकुमार गोरे, अतुल सावे,माधुरी मिसाळ,चंद्रशेखर बावनकुळे,अशोक उईके,आकाश फुंडकर,संजय सावकारे
शिवसेनेकडून कोणाला मंत्रिपदासाठी फोन-
(Shivsena Cabinet Minister List)उदय सांमतप्रताप सरनाईकशंभूराज देसाईयोगश कदमआशिष जैस्वालभरत गोगावलेप्रकाश आबिटकरदादा भूसेगुलाबराव पाटीलसंजय राठोडसंजय शिरसाट