मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 चे (Maharashtra Assembly Elections 2024) बिगुल वाजले आहे. या पार्श्वभूमीवर महायुतीत (Mahayuti) भाजपने रविवारी 99 उमेदवारांची पहिली यादी (BJP Candidate List) जाहीर केली. या पाठोपाठ राष्ट्रवादी अजित पवार गट उमेदवारांची पहिली यादी (NCP Ajit Pawar Group Candidate List) आज सायंकाळी जाहीर करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.  पहिल्या यादीत 32 ते 35 उमेदवारांच्या नावाची घोषणा केली जाऊ शकते. तर यादी जाहीर करण्यापूर्वीच अजित पवार उमेदवारी निश्चित असलेल्या आमदारांना देवगिरी बंगल्यावर एबी फॅार्मचे वाटप करत आहेत. त्यामुळे देवगिरी बंगल्यावर अजित पवार गटाच्या नेत्यांची मोठी गर्दी झाली असून आतापर्यंत 17 उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप करण्यात आले आहे. 


राज्यात एकाच टप्प्यात निवडणुका होणार असून 20 नोव्हेंबरला मतदान पार पडणार आहे. तर 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आल्याचे दिसून येत आहे. त्यातच अजित पवारांकडून एबी फॉर्मचे वाटप केले जात असून भरत गावित आणि हिरामण खोसकर यांच्यासह 15 जणांना अर्ज मिळाले आहेत.


जनता जनार्दन माझा विजय नक्की करेल : भरत गावित


एबी फॉर्म मिळाल्यानंतर भरत गावित म्हणाले की, मला एबी फॉर्म दिलेला आहे. माझा मतदारसंघ हा राखीव आहे. नवापूर मतदारसंघातून मला उमेदवारी देण्यात आली आहे. लोकसभेला परिस्थिती वेगळी होती, आता वेगळी आहे. मी नक्की जिंकून येणार आहे. मला उमेदवारी दिल्याबद्दल अजितदादा, सुनील तटकरे यांचे आभार. तटकरे यांच्या उपस्थितीमध्ये मी येत्या 24 तारखेला फॉर्म भरणार आहे.  जनता जनार्दन माझा विजय नक्की करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. 


निवडणूक कशी होईल ते बघा : हिरामण खोसकर 


तर हिरामण खोसकर म्हणाले की, काँग्रेसकडे आम्ही दोन महिने जात होतो. पण त्यांनी ऐकले नाही.  मग आमची फसवणूक होईल असं वाटलं आणि आम्ही राष्ट्रवादीमध्ये आलो.  इथे एबी फॉर्म घ्यायला आमची 500 लोक आली आहेत.  मग निवडणूक कशी होईल ते बघा.  सकाळी 8 वाजता मला फोन आला आणि आता लगेच आम्ही या ठिकाणी आलो. मी इथे या ठिकाणी शिपाई म्हणून काम करणार आहेत. दादांनी मतदारसंघात काम करायला सांगितलं आहे. सगळे लोक एका बाजूला आलेत तर ती बंडखोरी राहिली नाही. विरोधकांची यादी अजून येत नाही. पण विजय आमचा होणार आहे, असे त्यांनी म्हटले. 


17 जणांना एबी फॉर्मचं वाटप



  1. राजेश विटेकर 

  2. संजय बनसोडे

  3. चेतन तुपे

  4. सुनील टिंगरे

  5. दिलीप वळसे पाटील

  6. दौलत दरोडा

  7. राजेश पाटील

  8. दत्तात्रय भरणे

  9. आशुतोष काळे

  10. हिरामण खोसकर 

  11. ⁠नरहरी झिरवळ

  12. ⁠छगन भुजबळ

  13. ⁠भरत गावित 

  14. ⁠बाबासाहेब पाटील

  15. ⁠अतुल बेनके


आणखी वाचा


Maharashtra Assembly Elections 2024 : शरद पवारांचा मोठा डाव, सिन्नरचे उदय सांगळे आज तुतारी फुंकणार, माणिकराव कोकाटेंविरोधात तिकीट फिक्स?