नाशिक : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची (Maharashtra Assembly Elections 2024) रणधुमाळी सुरु झाली आहे. राज्यात महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) अशी लढत होणार असून सर्वच राजकीय पक्षांकडून निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली जात आहे. तर अनेक इच्छुक उमेदवारांकडून तिकिटासाठी फिल्डिंग लावली जात आहे. आता नाशिकच्या सिन्नर विधानसभा मतदारसंघात (Sinnar Assembly Constituency) उदय सांगळे (Uday Sangle) हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात (NCP Sharad Pawar Group) आज प्रवेश करणार आहेत. यामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे (NCP Ajit Pawar Group)  विद्यमान आमदार माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. 


राज्यात एकाच टप्प्यात निवडणुका होणार असून 20 नोव्हेंबरला मतदान पार पडणार आहे. तर 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आल्याचे दिसून येत आहे. त्यातच गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी शरद पवार गटात मोठ्या प्रमाणावर इनकमिंग सुरु आहे. सिन्नर विधानसभेची जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मिळण्याची शक्यता असून निवडणुकीच्या तोंडावरच उदय सांगळे शरद पवार गटात दाखल होणार आहे. 


उदय सांगळे तुतारी हाती घेणार


सिन्नर विधानसभा मतदारसंघातून उदय सांगळे हे निवडणुकीसाठी इच्छुक आहेत. ते आज शरद पवार यांच्या राष्ट्रवादी प्रवेश करणार आहेत. मुंबई येथे हा पक्ष प्रवेश होणार असून उदय सांगळे हे सिन्नरमधून शरद पवार गटाचे संभाव्य उमेदवार असण्याची शक्यता आहे. उदय सांगळे यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून तिकीट मिळाले तर सिन्नरमध्ये उदय सांगळे विरुद्ध माणिकराव कोकाटे यांच्यात लढत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सिन्नर मतदारसंघाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. 


माणिकराव कोकाटेंसमोर तगडे आव्हान


दरम्यान, सिन्नरमधून उदय सांगळे यांच्या उमेदवारीला ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून सुरुवातीला विरोध झाल्याचे पाहायला मिळाले होते. ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी खासदार संजय राऊत यांच्याकडे उदय सांगळे यांच्याबाबत तक्रारही केली होती. मात्र आता हा वाद मिटल्याची माहिती समोर येत आहे. उदय सांगळे यांचा सिन्नरमध्ये दांडगा जनसंपर्क आहे. ते विद्यमान आमदार माणिकराव कोकाटे यांच्यासमोर तगडे आव्हान निर्माण करू शकतात. त्यामुळे शरद पवारांकडून उदय सांगळे यांनी तिकीट दिले जाण्याची शक्यता आहे. 


आणखी वाचा


शिवसेना-काँग्रेस वाद मिटला, शरद पवारांची मध्यस्थी, पाटील मातोश्रीवर; उमेदवार यादीचा मुहूर्त ठरला